माहिती आणि प्रसारण मंत्रालय
आकाशवाणी पणजीने डीआरएम डिजिटल रेडिओ प्रसारणावर मराठीतील प्रोमो व्हिडिओ केला प्रकाशित
Posted On:
21 AUG 2024 7:35PM by PIB Mumbai
पणजी, 21 ऑगस्ट 2024
आकाशवाणी पणजीच्या डीआरएम डिजिटल रेडिओ प्रसारणावरील मराठी भाषेतील प्रोमो व्हिडिओ आकाशवाणी पणजी आणि गोवा दूरदर्शनचे उपमहासंचालक (ई) आणि पणजी येथील हाय पॉवर ट्रान्समीटर (एचपीटी) कार्यालय प्रमुख सुनील भाटिया यांच्या हस्ते बुधवार, 21 ऑगस्ट 2024 रोजी एचपीटी आकाशवाणी पणजी, बांबोलीम येथे आयोजित कार्यक्रमात प्रकाशित करण्यात आला.

आकाशवाणी पणजीने अलीकडेच गोव्यातील डीआरएम डिजिटल रेडिओवर जनजागृती करण्यासाठी आणि विविध माहिती आणि मनोरंजनपर व्यवस्थेतील सर्व लक्षित गटांना डीआरएम डिजिटल रेडिओचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक देण्यासाठी आदर्श जागरूकता मोहिमा आयोजित केल्या होत्या.
91B2.jpeg)
राज्यातील कार मालक, विक्री व्यवस्थापक, विक्री अधिकारी, रिलेशनशिप मॅनेजर आणि कार शोरूम कर्मचारी यांच्यासाठी या मोहिमा होत्या.या जनजागृती मोहिमांवर आधारित, मराठी भाषेतील व्हिडिओ प्रोमो डीआरएम डिजिटल रेडिओच्या डॉ.थम्मिनाना कृष्ण राव आणि आकाशवाणी पणजीच्या एचपीटी चे सहाय्यक अभियंता सी.पी. हरिकुमार यांनी लोकांसाठी तयार केला होता.या दोघांनीही उपमहासंचालक (ई) सुनील भाटिया यांच्या देखरेखीखाली मोहिमांमध्ये भाग घेतला.
मारुती (एरिना आणि नेक्सा), एमजी मोटर्स, टोयोटा आणि मर्सिडीज बेंझसह विविध शोरूम्समध्ये आदर्श जागरूकता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. गोवा राज्यात डीआरएम डिजिटल रेडिओ सुविधांनी सुसज्ज सुमारे दोन लाख गाड्या आहेत.
बुधवारी प्रदर्शित झालेला मराठीतील डीआरएम डिजिटल रेडिओ जागरूकतेचा प्रोमो नमुना सर्वेक्षण आणि लक्षित गटांच्या अभिप्रायाच्या आधारे तयार करण्यात आला आहे.
याआधी, आकाशवाणी पणजीने 15 ऑगस्ट 2024 रोजी 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त कोकणी भाषेत प्रोमो व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. हा व्हिडिओ आता दूरदर्शन गोव्याच्या युट्यूब चॅनेलवर उपलब्ध आहे.
S.Kane/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2047404)
Visitor Counter : 66