सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
जुलै 2024 या महिन्यासाठी आधार वर्ष 2012 = 100 यानुसार ग्रामीण, शहरी आणि संयुक्त ग्राहक किंमत निर्देशांक
Posted On:
12 AUG 2024 9:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 ऑगस्ट 2024
ठळक मुद्दे:
- जुलै 2024 च्या अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) क्रमांकावर आधारित वार्षिक महागाई दरात तीव्र घट झाली आहे, जी गेल्या 59 महिन्यांतील सर्वात कमी आहे.
- अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) क्रमांकावर आधारित वार्षिक चलनवाढीचा दर जुलै, 2024 महिन्यासाठी 3.54% (तात्पुरता) आहे. ग्रामीण आणि शहरी भागासाठी संबंधित महागाई दर अनुक्रमे 4.10% आणि 2.98% आहे.
- जुलै 2024 साठी खाद्यान्न चलनवाढ जून 2023 नंतर सर्वात कमी आहे. जुलै, 2024 महिन्यासाठी, अखिल भारतीय ग्राहक खाद्यान्न किंमत निर्देशांक (CFPI) क्रमांकावर आधारित वार्षिक महागाई दर 5.42% (तात्पुरता) आहे. ग्रामीण आणि शहरी भागासाठी संबंधित महागाई दर अनुक्रमे 5.89% आणि 4.63% आहे.
- जुलै 2024 मध्ये सर्व गटांच्या महागाईत घट झाली आहे. भाज्या, फळे आणि मसाल्यांच्या उपसमूहात लक्षणीय घट झाली आहे.
सर्वसाधारण निर्देशांक आणि ग्राहक खाद्यान्न किंमत निर्देशांक (CFPIs) वर आधारित अखिल भारतीय महागाई दर ( विद्यमान महिन्यातील दर आणि गेल्या वर्षी याच महिन्यातील दर म्हणजे जुलै 2023 च्या तुलनेत जुलै 2024 मधील दर) खालीलप्रमाणे आहेत:
ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) (सर्वसाधारण) आणि ग्राहक खाद्यान्न किंमत निर्देशांक (CFPI) वर आधारित अखिल भारतीय वार्षिक महागाई दर (%) : जुलै 2023 च्या तुलनेत जुलै 2024 मधील दर
July 2024 (Prov.)
|
June 2024 (Final)
|
July 2023
|
Rural
|
Urban
|
Combd.
|
Rural
|
Urban
|
Combd.
|
Rural
|
Urban
|
Combd.
|
Inflation
|
CPI (General)
|
4.10
|
2.98
|
3.54
|
5.66
|
4.39
|
5.08
|
7.63
|
7.20
|
7.44
|
CFPI
|
5.89
|
4.63
|
5.42
|
9.15
|
9.6
|
9.36
|
11.04
|
12.37
|
11.51
|
Index
|
CPI (General)
|
195.3
|
190.2
|
192.9
|
192.2
|
187.8
|
190.2
|
187.6
|
184.7
|
186.3
|
CFPI
|
201.3
|
210
|
204.3
|
195.6
|
204.3
|
198.7
|
190.1
|
200.7
|
193.8
|
Notes: Prov. – Provisional, Combd. – Combined
सर्वसाधारण निर्देशांक आणि ग्राहक खाद्यान्न किंमत निर्देशांकामधील मासिक बदल खाली दिले आहेत:
अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (सर्वसाधारण) आणि ग्राहक खाद्यान्न किंमत निर्देशांकामधील मासिक बदल (%): जून 2024 च्या तुलनेत जुलै 2024 मधील दर
Indices
|
July 2024 (Prov.)
|
June 2024 (Final)
|
Monthly change (%)
|
Rural
|
Urban
|
Combd.
|
Rural
|
Urban
|
Combd.
|
Rural
|
Urban
|
Combd.
|
CPI (General)
|
195.3
|
190.2
|
192.9
|
192.2
|
187.8
|
190.2
|
1.6
|
1.3
|
1.4
|
CFPI
|
201.3
|
210
|
204.3
|
195.6
|
204.3
|
198.7
|
2.9
|
2.8
|
2.8
|
टीप: जुलै 2024 चे आकडे तात्पुरते आहेत.
प्रतिसाद दर: सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांद्वारे देशातील विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामधील 1114 शहरी बाजारपेठा आणि 1181 गावातील बाजारांना प्रत्यक्षपणे साप्ताहिक भेटी देऊन माहिती संकलित केली जाते. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जुलै 2024 मध्ये 100% ग्रामीण आणि 98.5% शहरी बाजारपेठांमधून माहिती गोळा केली, तर बाजारनिहाय किमती ग्रामीण बाजारपेठांसाठी 88.71% आणि शहरी बाजारपेठांसाठी 92.64% नोंदवण्यात आल्या होत्या.
ऑगस्ट 2024 ग्राहक किंमत निर्देशांक प्रसिद्ध करण्याची पुढील तारीख 12 सप्टेंबर 2024 (गुरुवार) आहे. अधिक माहितीसाठी कृपया www.mospi.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
परिशिष्ट यादीसाठी येथे क्लिक करा:
- परिशिष्ट I: जून 2024 (अंतिम) आणि जुलै 2024 (तात्पुरती) साठी ग्रामीण, शहरी आणि संयुक्त (आधार: 2012=100) साठी अखिल भारतीय सामान्य, गट आणि उप-समूह स्तर ग्राहक किंमत निर्देशांक आणि ग्राहक खाद्यान्न किंमत निर्देशांक
- परिशिष्ट II: जुलै 2024 (तात्पुरते) साठी ग्रामीण, शहरी आणि संयुक्त (आधार: 2012=100) अखिल भारतीय वार्षिक महागाई दर (%) सामान्य, गट आणि उप-गट स्तरावरील ग्राहक किंमत निर्देशांक आणि ग्राहक खाद्यान्न किंमत निर्देशांक
- परिशिष्ट III: राज्यांसाठी जून 2024 (अंतिम) आणि जुलै 2024 (तात्पुरती) साठी ग्रामीण, शहरी आणि संयुक्त (आधार: 2012=100) सर्वसाधारण ग्राहक किंमत निर्देशांक.
- परिशिष्ट VI: प्रमुख राज्यांसाठी जुलै 2024 साठी ग्रामीण, शहरी आणि संयुक्त राज्यांचे वार्षिक महागाई दर (%) (तात्पुरते) (आधार: 2012=100)
* * *
S.Patil/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2044716)
Visitor Counter : 100