विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

“परवडणाऱ्या किंमतीत जागतिक तोडीची आरोग्यसेवा देणारे ठिकाण आणि जागतिक औषधोद्योगातले नेतृत्व म्हणून भारताचा उदय” केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांचे वक्तव्य


प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेला भारताच्या व्हिजन 2047 मध्ये राष्ट्रीय प्राधान्य – डॉ.जितेंद्र सिंह

Posted On: 06 AUG 2024 9:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 ऑगस्ट 2024

परवडणाऱ्या किंमतीत जागतिक तोडीची  आरोग्यसेवा देणारे ठिकाण  म्हणून भारताचा उदय होत असून त्याचवेळी जागतिक औषधोद्योगात देश आघाडी घेत असल्याचे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार)मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी अधोरेखित केले. भारतीय उद्योग महासंघ – सीआयआयने ल मेरिडिअन हॉटेलात आज आयोजित केलेल्या “जागतिक मेडटेक शिखर परिषद 2024” मध्ये ते उपस्थितांना संबोधित करत होते.

अलिकडच्या काळात आरोग्यसेवेबाबत देशात घडवून आणलेल्या बदलाविषयी डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले,“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आरोग्यसंपन्न  भारतासाठी संसर्गजन्य रोगांचे निराकरण आणि संसर्गातून पसरत नाहीत अशा रोगांना प्रतिबंध करण्यासाठी आरोग्याचे निर्देशांक निश्चित करत आहे आणि सातत्याने प्रगती करत आहे.”त्यांनी सांगितले, “कोविड महासाथीच्या काळात भारताने जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवली; ही बाब प्रत्येक नागरिकाला हक्काची आरोग्यसेवा पुरवण्यासाठी मोदी सरकार वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार करणारी आहे.” चयापचय क्रियेशी संबंधित विकार आणि त्यातून निर्माण होणारे इतर अनेक रोग यांवर भर देताना त्यांनी मनुष्याच्या वाढलेल्या आयुष्यमानामुळे नवे रोग निर्माण होऊ लागल्याचे सांगितले.

भारताचे  व्हिजन 2047 साकारण्यासाठी प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेला राष्ट्रीय प्राधान्यक्रमावर ठेवल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. जितेंद्र सिंह, जे स्वतः औषधे आणि एण्डोक्रायनोलॉजीचे प्राध्यापक आहेत, त्यांनी उतारवयात होणारे टाईप 2 मधुमेह, हृदयविकार, आदी घातक विकारांचा प्रादुर्भाव कमी वयात होताना दिसत असल्याचे सांगितले. हे केवळ आरोग्यसेवेसमोर असलेले आव्हान नव्हे; तर निरोगी राहिल्यास राष्ट्रबांधणी आणि व्हिजन 2047 साकारण्यात योगदान देऊ शकेल अशा युवा लोकसंख्येच्या ऊर्जा आणि क्षमतेला निर्माण झालेला धोका आहे, असे ते म्हणाले.

डॉ. जितेंद्र सिंह यांनी “पीपीपी + पीपीपी” सहयोगाचे समर्थन करून भारतातील सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांना इतर देशांतील सार्वजनिक व खाजगी क्षेत्रांशी भागीदारी करण्याचे आवाहन केले. अशा भागीदारीतून आर्थिक स्रोतांना बळ मिळेल आणि ज्ञानाच्या कक्षाही रुंदावतील, या बाबीकडे त्यांनी लक्ष वेधले.

विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री म्हणाले, “आरोग्योपचार उपकरणांचे क्षेत्र देशातील उदयोन्मुख क्षेत्रांपैकी एक गणले जात असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार भारताला त्यासाठीचे उत्पादन केंद्र बनवण्यासाठी शक्य ते प्रत्येक पाऊल उचलत आहे.”

डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले की आरोग्यसेवेचा सर्वांना समान पुरवठा करण्यामध्ये तंत्रज्ञानाची महत्त्वाची भूमिका आहे. तंत्रज्ञानामुळे आरोग्यसेवा क्षेत्रात क्रांती घडून येत आहे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि मशिन लर्निंग (एमएल)ची जोड मिळाल्यामुळे आपल्या तंत्रज्ञान वापराच्या क्षमतांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे आपण कार्यक्षमतेत वाढ घडवून आणू शकतो, प्रतिक्षेचा कालवधी कमी करू शकतो आणि एकूणच आरोग्यसेवा पुरवठ्यात सुधारणा घडवून आणू शकतो.

 
N.Chitale/R.Bedekar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2042373) Visitor Counter : 56


Read this release in: English , Urdu , Hindi , Hindi_MP