संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय नौदल जहाज तबर ने  रशियाचे  नौदल जहाज सूब्राझिटलनी बरोबर केला सागरी भागीदारी सराव

Posted On: 02 AUG 2024 6:03PM by PIB Mumbai

 

भारतीय नौदलाचे आघाडीचे जहाज आयएनएस तबर रशियाच्या 328 व्या नौदल दिन संचलन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी 25 जुलै 24 रोजी सेंट पीटर्सबर्ग, रशिया येथे पोहोचले. भारत आणि रशिया यांच्यात प्रगाढ द्विपक्षीय संबंध आणि विविध क्षेत्रात  सागरी सहकार्य आहे. आयएनएस तबरच्या भेटीचा उद्देश ही दीर्घकालीन मैत्री दृढ करणे आणि दोन्ही देशांमधील संबंधांना बळकटी देण्यासाठी नवीन संधींचा शोध घेणे हा आहे.

सेंट पीटर्सबर्ग येथून निघाल्यावर आयएनएस तबर ने 30 जुलै 2024 रोजी रशियन नौदलाच्या सूब्राज़िटेलनी जहाजासोबत सागरी भागीदारी सराव (एमपीएक्स ) यशस्वीपणे पार पाडला.  328 व्या रशियन नौदल दिन संचलनात भारतीय नौदलाच्या जहाज तबरचा सहभाग आणि एमपीएक्स चे संचलन  भारत आणि रशिया यांच्यातील सागरी सहकार्यातील मैलाचा दगड असून  या क्षेत्रात शांतता, स्थैर्य आणि सुरक्षा राखण्याप्रति  दोन्ही देशांच्या  वचनबद्धतेला अधिक बळ देणारे आहे.  एमपीएक्समध्ये संचार अभ्यास , शोध आणि बचाव रणनीती आणि समुद्रात   पुनःपूर्ति सह अनेक जटिल नौदल कवायतींचा  समावेश होता . दोन्ही नौदलाच्या जहाजांनी उच्च स्तरीय  व्यावसायिकता आणि आंतर -संचालन कार्यक्षमतेचे दर्शन घडवले.

भारतीय नौदल जगभरातील नौदलांसोबत भागीदारी वृद्धिंगत करण्यासाठी वचनबद्ध आहे. रशियन नौदलासह एमपीएक्स मजबूत द्विपक्षीय नौदल संबंध मजबूत करते आणि सागरी क्षेत्रामध्ये अधिक  सहकार्य सुनिश्चित करण्याप्रति आपला संकल्प आणि वचनबद्धता अधिक दृढ  करते.

***

S.Patil/S.Kane/P.Kor

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2041052) Visitor Counter : 77


Read this release in: English , Urdu , Hindi , Hindi_MP