सांस्कृतिक मंत्रालय
आगामी युग युगीन भारत संग्रहालयासाठी तीन दिवसीय राज्य परिषदेचे केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते उद्घाटन
प्रविष्टि तिथि:
01 AUG 2024 6:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 ऑगस्ट 2024
आगामी युग युगीन भारत संग्रहालयासाठी तीन दिवसीय राज्य परिषदेचे उदघाटन आज केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते झाले. केंद्रीय संस्कृती मंत्रालयाने नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे 1 ते 3 ऑगस्ट 2024 या कालावधीत या परिषदेचे आयोजन केले आहे.

युगयुगीन भारत संग्रहालयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना प्रत्यक्ष साकार करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य संगहालये यांच्यातील सहयोग वृद्धिंगत करणे, हा या तीन दिवसीय परिषदेचा हेतू आहे.‘युग युगीन भारत संग्रहालया’साठी देशातील कलावस्तू संपत्तीची सर्वसमावेशक समज वाढवण्यासाठी,राज्यांना त्यांच्या संबंधित राज्यांच्या संग्रहाबद्दल तपशीलवार अंतर्दृष्टी प्रदान करण्यासाठी या परिषदेत आमंत्रित करण्यात आले आहे.


ही राज्य परिषद भारतातील संग्रहालय परिसंस्था आणखी मजबूत करेल आणि ‘युग युगीन भारत संग्रहालय’ प्रकल्पासाठी संभाव्य सहकार्यांसह प्रशिक्षण आणि अनुभव सामायिक करण्याच्या संधी देईल,अशी आशा शेखावत यांनी व्यक्त केली.सहकारी संघराज्यवादाच्या भावनेने आणि संपूर्ण सरकार या दृष्टीकोनातून, या विचारमंथनातून मिळालेले ज्ञान, भारताच्या 'विकासही आणि वारसाही' या संकल्पनेला अनुसरून, हे संग्रहालय 'जगातील आश्चर्य' म्हणून विकसित करण्यात महत्त्वपूर्ण ठरेल,असे त्यांनी सांगितले.

राज्यस्तरीय संग्रहालय विकासाला पाठबळ देण्यासाठी उपलब्ध निधीपुरवठा योजनांचा आढावा संस्कृती मंत्रालय या तीन दिवसीय परिषदेत मांडेल. यात अलीकडेच सुधारणा केलेली संग्रहालय अनुदान योजना आणि विज्ञान संस्कृतीला चालना देण्याच्या योजनेचा समावेश आहे. नवी दिल्ली येथे रायसीना हिलजवळ देशाच्या मध्यवर्ती प्रशासकीय क्षेत्राची पुनर्रचना करण्यासाठीच्या सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पाचा एक भाग म्हणून युग युगीन भारत संग्रहालय नॉर्थ आणि साउथ ब्लॉक येथे उभारण्यात येणार आहे.
S.Kane/S.Kakade/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2040395)
आगंतुक पटल : 131