संरक्षण मंत्रालय
वायनाडमधील भूस्खलनाने बाधित झालेल्या भागात लष्कराकडून बचाव कार्याला गती
Posted On:
31 JUL 2024 8:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 जुलै 2024
केरळमधील वायनाड मध्ये 30 जुलै 2024 रोजी झालेल्या अनेक विनाशकारी भूस्खलनानंतर अडकलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी सुरू असलेल्या मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण कार्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय लष्कराने आपले प्रयत्न तीव्र केले आहेत. 30 जुलै च्या पहाटे नागरी प्रशासनाकडून प्राप्त प्रारंभिक विनंतीनंतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह सुमारे 500 कर्मचाऱ्यांचा समावेश असलेले सहा एचएडीआर पथके , ब्रिजिंग उपकरणे आणि बचावासाठीचे श्वानपथक तैनात करण्यात आले आहेत. सुमारे 1000 लोकांना लष्कराने वाचवले आहे, त्यांना वैद्यकीय मदत दिली आहे आणि त्यांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. 86 मृतदेहही सापडले आहेत.
अडकलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज असून सर्वांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. या आव्हानात्मक काळात केरळ राज्याला पाठिंबा देण्यासाठी लष्कर वचनबद्ध आहे. बाधित भागात मदत आणि बचाव कार्यासाठी बचाव पथके अविश्रांत परिश्रम घेत आहेत.
* * *
N.Chitale/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2039917)
Visitor Counter : 95