संरक्षण मंत्रालय
एनसीसीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंग यांनी गोव्याला भेट दिली आणि राज्यातील विस्तार योजनांबाबत केली चर्चा
Posted On:
26 JUL 2024 10:08PM by PIB Mumbai
गोवा, 26 जुलै 2024
गोव्याच्या दोन दिवसीय अधिकृत दौऱ्यावर असलेले राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी ) चे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंग यांनी शुक्रवार, 26 जुलै 2024 रोजी 1 गोवा बटालियन एनसीसी पणजी च्या कार्यालयात एनसीसीच्या स्थानिक युनिट अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि राज्यातल्या विस्ताराच्या योजनांवर चर्चा केली.
गुरुवार, 25 जुलै रोजी गोव्यात आलेले लेफ्टनंट जनरल सिंग यांनी अधिकाऱ्यांना राज्यभरातील विद्यार्थ्यांना छात्रसेनेत सामील होण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या दिशेने काम करण्याचे आवाहन केले.

सुब्रतो चषकासाठी गोवा एनसीसी फुटबॉल संघाची उत्तम बांधणी केल्याबद्दल महासंचालकांनी कौतुक केले आणि कॅडेट्सना जोगो बोनिटोमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी पूर्ण पाठिंबा दर्शवला.
कनकोलिम चीफटेन्स शहीद स्मृती दिनाच्या कार्यक्रमात कॅडेट्सच्या सहभागाने प्रभावित होऊन, त्यांनी कॅडेट्समध्ये राष्ट्रवाद आणि देशभक्तीची भावना निर्माण करण्यासाठी त्यांना गोव्यातील ऐतिहासिक आणि वारसा स्थळांची भेट घडवून आणण्याचे आवाहन अधिकाऱ्यांना केले . कनकोलिम मधील कार्यक्रमात कॅडेट्सचा सहभाग हा नियमित असायला हवा असे ते म्हणाले.
तत्पूर्वी शुक्रवारी, कारगिल विजय दिवसाच्या रौप्यमहोत्सवाच्या निमित्ताने माजी एनसीसी कॅडेट्स असोसिएशन-गोवा यांनी ज्युनियर चेंबर इंटरनॅशनल आणि केंद्रीय संचार ब्युरो, गोवा (सीबीसी) यांच्या संयुक्त विद्यमाने मिरामार बीच ते आझाद मैदान, पणजीपर्यंत काढलेल्या मोटारसायकल रॅलीला लेफ्टनंट जनरल सिंग यांनी हिरवा झेंडा दाखवला. सीबीसीतर्फे आयोजित कारगिल युद्धावरील छायाचित्र प्रदर्शनाचेही त्यांनी उद्घाटन केले.
5HX9.jpeg)
आझाद मैदानावरील हुतात्म्यांच्या स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर वीरांना त्यांनी आदरांजली वाहिली.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, कारगिल हिल्सवर आपली भूमी पुन्हा ताब्यात घेण्यासाठी आपल्या शहीदांनी दिलेले सर्वोच्च बलिदान आणि युद्धातील आपल्या वीरांचे शौर्य आपल्या देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी विद्यमान आणि भावी पिढ्यांना यापुढेही प्रेरणा देत राहील.

* * *
PIB Panaji | S.Patil/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2037816)
Visitor Counter : 58