अवजड उद्योग मंत्रालय

सरकारने ईएमपीएस 2024 योजनेचा कालावधी दोन महिन्यांनी म्हणजे 30 सप्टेंबर 2024 पर्यंत वाढवला, खर्चातही 778 कोटीपर्यंत वाढ

Posted On: 26 JUL 2024 9:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 जुलै 2024

 

केंद्र सरकारच्या अवजड उद्योग मंत्रालयाने 13 मार्च 2024 रोजी राजपत्र अधिसूचना 1334 (E) द्वारे इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रमोशन स्कीम 2024 (इएमपीएस 2024) ही योजना सुरू केली. या योजनेमुळे देशभरात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला चालना मिळणार आहे. 1 एप्रिल ते 31 जुलै 2024 या कालावधीत 500 कोटी रूपये खर्चासह या योजनेची अंमलबजावणी होत आहे. योजनेचा कालावधी आणखी दोन महिन्यांसाठी वाढवला असून आता 30 सप्टेंबर 2024 पर्यंत ही योजना राबवली जाईल. योजनेसाठीचा खर्च 778 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या हरित उपक्रमांना प्रोत्साहन देणे तसेच देशातील इलेक्ट्रिक वाहन उत्पादन परिसंस्थेच्या वाढीस चालना देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.

पात्र इलेक्ट्रिक वाहन श्रेणी

  1. दुचाकी (इलेक्ट्रिक) (e-2W)
  2. नोंदणीकृत ई-रिक्षा आणि ई-गाड्या आणि L5 (e-3W) सह तीनचाकी (इलेक्ट्रिक)

जनतेसाठी परवडणारे आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीचे पर्याय उपलब्ध करून देण्यावर या योजनेचा भर आहे.  ही योजना प्रामुख्याने व्यावसायिक हेतूंसाठी नोंदणीकृत e-2W आणि e-3W साठी लागू होईल., व्यावसायिक वापराव्यतिरिक्त, खाजगी किंवा कॉर्पोरेट मालकीची नोंदणीकृत e-2W वाहने देखील योजनेसाठी पात्र ठरतील.

योजनेचा उपकरणांप्रमाणे वाढीव खर्च खालीलप्रमाणे आहे:

Components

Description

6 महिन्यांसाठी एकूण निधीची आवश्यकता (भारतीय रूपये कोटीमध्ये)
सबसिडी/मागणी प्रोत्साहन नोंदणीकृत ई-रिक्षा आणि ई-गाड्या आणि L5 (e-3W) सह इलेक्ट्रिक 2W (e-2W) आणि इलेक्ट्रिक 3 W साठी प्रोत्साहन

769.65

योजनेचे प्रशासन आयइसी (माहिती, शिक्षण आणि संप्रेषण) कृती आणि प्रकल्प व्यवस्थापन संस्थेसाठी शुल्कासह

8.35

एकूण

 

778.00

 

सुधारित उद्दिष्ट क्रमांक

500,080 इलेक्ट्रिक टू-व्हीलर (e-2Ws) आणि 60,709 इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर (e-3Ws) समाविष्ट असलेल्या 560,789 इलेक्ट्रिक वाहनांना मदतीचे उद्दिष्ट आहे. यामध्ये 13,590 रिक्षा आणि ई-कार्ट तसेच L5 श्रेणीतील 47,119 e-3W चा समावेश आहे. प्रगत तंत्रज्ञानाचा प्रचार करण्यासाठी, प्रगत बॅटरींनी सुसज्ज असलेल्या ईव्हीसाठीच सवलती उपलब्ध असतील.  योजना निधी मर्यादित आहे आणि ईव्ही देखील नमूद केल्याप्रमाणे प्रत्येक परिभाषित श्रेणीसाठी लक्ष्यित संख्यांपुरते मर्यादित आहेत.

 

* * *

S.Patil/P.Jambhekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2037813) Visitor Counter : 67


Read this release in: English , Hindi , Hindi_MP