जलशक्ती मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांनी केंद्रीय जल आयोगाच्या ‘भारतातील पुरामुळे प्रभावित क्षेत्राचे मूल्यांकन’ यावरील प्रकाशनाचे केले विमोचन


विविध संरचनात्मक उपाययोजनांद्वारे देशात 20.5 दशलक्ष हेक्टर क्षेत्र पुरापासून संरक्षित केले गेले : सीडब्ल्यूसी प्रकाशन

पुराचा प्रभाव कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात आणि पुरापासून संरक्षण करण्याची पुढील कारवाई करण्यात विविध हितधारकांना मदत होईल

Posted On: 25 JUL 2024 9:28PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 जुलै 2024

केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांनी आज नवी दिल्ली येथे केंद्रीय जल आयोगाद्वारे(सीडब्ल्यूसी) प्रकाशित ‘भारतातील पुरामुळे प्रभावित क्षेत्राचे मूल्यांकन’ चे विमोचन  केले.

जलसंसाधन  क्षेत्रातील भारतातील एक प्रमुख तांत्रिक संस्था सीडब्ल्यूसी ने 1986-2022 या कालावधीसाठी उपग्रह प्रतिमांचा वापर करून सर्व पूर घटनांची नोंद करून वैज्ञानिक अभ्यास केला आहे. या प्रकाशनातून असे दिसून आले आहे की विविध संरचनात्मक उपाययोजना करून देशातील सुमारे 20.5 दशलक्ष हेक्टर क्षेत्राचे  पुरापासून संरक्षण करण्यात आले आहे. तसेच 1986-2022 या कालावधीतील विश्लेषणानुसार देशातील सुमारे 21 दशलक्ष हेक्टर क्षेत्र पुरामुळे प्रभावित झाले आहे.

या प्रकाशनात पूरग्रस्त भागांचा जिल्हानिहाय तपशील देण्यात आला आहे. पुराचा प्रभाव कमी करण्यासाठी पूर्व सूचना  प्रणाली विकसित करणे, पूर व्यवस्थापन धोरणांचा आगाऊ विकास, आपत्कालीन प्रतिसाद उपायांचे नियोजन आणि पुरामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी ते उपयुक्त ठरेल. त्यामुळे  नियोजक, धोरणकर्ते, आपत्ती व्यवस्थापक, मदत संस्था , शिक्षणतज्ज्ञ इत्यादींना आपापल्या क्षेत्रात पुराचा प्रभाव कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आणि  योग्य पूर संरक्षण कार्य हाती घेण्यात मदत होईल.

यावेळी उपस्थित इतर मान्यवरांमध्ये सचिव (जल संसाधन, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन)  देबश्री मुखर्जी, अध्यक्ष (केंद्रीय जल आयोग) कुशविंदर वोहरा आणि जलशक्ती मंत्रालय तसेच सीडब्ल्यूसी चे इतर वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश होता.

प्रकाशनावरील PPT साठी लिंक

S.Patil/S.Kane/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2037210) Visitor Counter : 59