संरक्षण मंत्रालय

ब्रह्मपुत्रा जहाजावरील घटनेविषयी ताजी माहिती

Posted On: 24 JUL 2024 9:06PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 जुलै 2024

 

मुंबईतील नौदलाच्या गोदीत भारतीय नौदलाचे जहाज ब्रह्मपुत्राच्या दुर्घटनेनंतर, नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश के त्रिपाठी यांनी 23 जुलै 24 रोजी मुंबईला भेट दिली. त्यांनी अपघाताच्या घटनांचा क्रम आणि बेपत्ता खलाशाचा शोध घेण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा आढावा घेतला.

जहाज लवकरात लवकर कार्यक्षम करण्याकरिता नुकसान आटोक्यात ठेवून पूर्वस्थितीत आणण्यासाठीची योजना आणि दुरुस्ती बाबत नौदल प्रमुखांना अवगत करण्यात आले. आयएनएस ब्रह्मपुत्राला समुद्रसफरीसाठी आणि लढाईसाठी सज्ज करण्याकरिता सर्व कार्यवाही त्वरित सुरू करण्याचे निर्देश नौदल प्रमुखांनी कमांड आणि नौदल मुख्यालयाला दिले.

आयएनएस ब्रह्मपुत्राच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधताना लष्कर प्रमुखांनी भारतीय नौदलात हे जहाज खऱ्या अर्थाने लवकर कार्यान्वित करण्याच्या दिशेने काम करण्याचे आवाहन केले.

समुद्रातील शोधमोहिमेनंतर आज प्रमुख खलाशी सीतेंद्र सिंह यांचा मृतदेह सापडला आहे.

नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश के त्रिपाठी आणि भारतीय नौदलाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी प्रमुख खलाशी सितेंद्र सिंह यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे. या दु:खद प्रसंगी भारतीय नौदल शोकाकुल परिवारासोबत खंबीरपणे उभे आहे.

 

* * *

S.Patil/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2036588) Visitor Counter : 21


Read this release in: Hindi , English