युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आशियाई कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राची कुस्तीपटू आयुष्का गाडेकरला सुवर्णपदक


मुंबईतील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या चार खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय मंचावर भारताचे प्रतिनिधित्व केले

Posted On: 23 JUL 2024 8:26PM by PIB Mumbai

मुंबई, 23 जुलै 2024
 

 

महाराष्ट्रातील कुस्तीपटू आयुष्का गाडेकर हिने 16 ते 24 जुलै 2024 या कालावधीत थायलंड येथे होणाऱ्या आशियाई कुस्ती स्पर्धेत अंडर-15 गटात (58 किलो) सुवर्णपदक पटकावले. भारतीय क्रीडा प्राधिकरण, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय, नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स (एनसीओई), मूळची  वाशिमची आणि आता मुंबईची  आयुष्का गाडेकर, पुण्याची प्रगती गायकवाड (59 किलो ,20 वर्षाखालील गट) आणि झारखंड मधील रांची येथील अमित गोपे (82 किलो ,20 वर्षाखालील गट) यांची आशियाई  कुस्ती  स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड करण्यात आली.

भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या एनसीओई,मुंबई येथील मुख्य कुस्ती प्रशिक्षक राज सिंग यांनी सर्व सहभागींचे कौतुक केले आणि आंतरराष्ट्रीय कुस्तीमध्ये भारताचे प्रतिनिधी म्हणून त्यांची भूमिका अधोरेखित केली. त्यांनी क्रीडा विज्ञान आणि प्रशासन कर्मचाऱ्यांचे त्यांच्या अमूल्य सहकार्याबद्दल कौतुक केले.

आयुष्काने तिची पदार्पणातली आंतरराष्ट्रीय स्पर्धा असूनही अंतिम फेरीत कझाकीस्तानच्या अरिना कुआनिशोव्हाविरुद्ध 6-2 असा विजय मिळवला. 2028 च्या ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यासाठीचे ध्येय निश्चित करून मिळवलेले तिचे हे यश तिचे कठोर परिश्रम आणि दृढनिश्चयाचा पुरावा आहे.

भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या,मुंबई येथील सहाय्यक कुस्ती प्रशिक्षक शिल्पी शेओरान यांनी आयुष्काच्या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक केले आणि भविष्यातील ऑलिम्पिक खेळांमध्ये सुवर्ण जिंकण्याच्या तिच्या क्षमतेवर विश्वास व्यक्त केला. तिने प्रादेशिक संचालक, पांडुरंग चाटे, एनसीओई  मुंबई संघ, प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचारी यांचे त्यांच्या योगदानाबद्दल आभार मानले.

प्रगती गायकवाड आणि अमित गोपे यांनीही या स्पर्धेत भाग घेतला. प्रगतीचा रेपेचेज फेरीत मंगोलियाच्या एर्डेनेबोलर ल्खाग्वासुरेनकडून पराभव झाला (10-5) तर अमितला पहिल्या फेरीत कोरियाच्या सोन एमविरुद्ध (1-1) पराभव पत्करावा लागला.

भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या एनसीओई,मुंबईने यावर्षी  उल्लेखनीय कामगिरी केली आहे.   आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्राच्या कोल्हापूर येथील समर्थ म्हाकावे  अंडर-17 आशियाई चॅम्पियनशिप) याच्यासह त्यांच्या चार खेळाडूंनी यात आपले योगदान दिले आहे.


S.Patil/G.Deoda/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2036089) Visitor Counter : 87


Read this release in: English