दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

टपाल विभागाने डिजिपिनची बीटा आवृत्ती सार्वजनिक अभिप्राय आणि तज्ञांच्या मतांसाठी उपलब्ध केली

Posted On: 22 JUL 2024 10:12PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 जुलै 2024

भारतात सार्वजनिक आणि खासगी सेवांच्या नागरिक-केंद्रित वितरणाच्या दृष्टीने सुलभपणे पत्ता निश्चित करता यावा, याकरिता प्रमाणित, भू-सांकेतिक पत्ता प्रणाली स्थापित करण्यासाठी टपाल विभागाने एक उपक्रम हाती घेतला आहे. या संदर्भात, विभागाने डिजिटल पोस्टल इंडेक्स नंबर (डिजिपिन) या नावाचे राष्ट्रीय पत्ता जाळे  विकसित करण्यासाठी आयआयटी हैदराबादशी सहकार्य केले होते.  ही प्रणाली भू-स्थानिक प्रशासनाचा एक सक्षम आणि मजबूत स्तंभ म्हणून काम करेल, ज्यामुळे सार्वजनिक सेवा वितरण, जलद आपत्कालीन प्रतिसाद आणि दळणवळण कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ होईल.

ही डिजिपिन पातळी पत्ता शोधण्यासाठीची संदर्भ यंत्रणा म्हणून काम करेल. हिच्या उभारणीत समावेश केलेल्या  तार्किक नाम आकृतीबंधामुळे दिशात्मक गुणधर्मांसह तार्किक दृष्ट्या पत्ता शोधण्यासाठी हिचा वापर केला जाऊ शकतो.

डिजिपिन संपूर्णत: सार्वजनिक डोमेनमध्ये उपलब्ध करण्याचा प्रस्ताव असून प्रत्येकजण या प्रणालीचा सहज वापर करू शकतो.  डिजिपिन‌ ग्रिड प्रणाली ही पत्ता संदर्भ प्रणाली  असल्याने विविध सेवा प्रदाते आणि वापरांसह इतर इकोसिस्टमसाठी आधारभूत पातळी म्हणून वापरली जाऊ शकते, जिथे पत्ता  हा कार्यप्रवाहातील एक प्रकार आहे.

ही प्रणाली भू-स्थानिक प्रशासनाचा एक सक्षम आणि मजबूत स्तंभ म्हणून काम करेल, ज्यामुळे सार्वजनिक सेवा वितरण, जलद आपत्कालीन प्रतिसाद आणि दळणवळण कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ होईल.

 
डिजिपिनच्या आगमनामुळे भौतिक ठिकाणे आणि त्यांचे डिजिटल प्रतिनिधित्व यांच्यातील महत्त्वपूर्ण अंतर सांधले जाऊन  डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने भारताच्या प्रवासातील एक क्रांतिकारी पाऊल पुढे टाकले जाईल.

टपाल विभागाने सार्वजनिक अभिप्रायासाठी 19.07.2024 रोजी राष्ट्रीय पत्ता जाळे अर्थात नॅशनल ॲड्रेसिंग ग्रिड ' डिजिपिन’ ची बीटा आवृत्ती जारी केली आहे, ज्याचे तपशील इंडिया पोस्ट संकेतस्थळाच्या आधारे  मिळविले  जाऊ शकतात: https://www.indiapost.gov.in/vas/Pages/digipin.aspx


टपाल विभाग प्रत्येकाला बीटा मंचावर मुशाफिरी करण्यासाठी आणि रचनात्मक अभिप्राय देण्यासाठी प्रोत्साहित करीत आहे, ज्यामुळे डिजिपिनची वैशिष्ट्ये सुसंगत होण्यास मदत होईल.  कृपया या संदर्भातील टिप्पणी आणि सूचना 22.09.2024 पर्यंत ईमेलद्वारे digipin@indiapost.gov.in यावर पाठवा.

 
S.Patil/N.Mathure/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 2035437) Visitor Counter : 10


Read this release in: English , Urdu , Hindi