संरक्षण मंत्रालय
भारतीय नौदलाची सातवी वार्षिक सुरक्षा आढावा बैठक - 2024
प्रविष्टि तिथि:
20 JUL 2024 7:50PM by PIB Mumbai
भारतीय नौदलाची सुरक्षाविषयक सातवी वार्षिक शिखर बैठक 19 जुलै 24 रोजी कोची येथील सदर्न नेव्हल कमांड येथे झाली. या बैठकीला नौदलाचे वरिष्ठ अधिकारी आणि नौदल मुख्यालय, क्षेत्र मुख्यालय आणि सुरक्षा श्रेणीतील प्रतिनिधी उपस्थित होते. नौदल प्रमुख अँडमिरल दिनेश के त्रिपाठी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बीजभाषण केले आणि वार्षिक सुरक्षा अहवालाचा आढावा घेतला. कर्मचारी वर्गाला सुरक्षितपणे विचार आणि कृती करण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी नौदल तुकड्यांना प्रोत्साहन देऊन सुरक्षा संस्कृती जोपासण्याची गरज असल्याचे मत त्रिपाठी यांनी यावेळी व्यक्त केले.
सुरक्षितता, संरक्षण तसेच मानसिक आरोग्य आणि निरोगीपणाला यंदाच्या वर्षात चालना देण्यासाठी वरिष्ठ नेतृत्वाने प्रत्येक स्तरावरचे सुरक्षा उपक्रम किती प्रभावी आहेत, हे तपासून बघितले पाहिजे आणि नौदलातील सुरक्षा स्थिती अधिक मजबूत केली पाहिजे, असे ते म्हणाले.
बैठकीची पुढील कार्यवाही नौदल उपप्रमुख आणि भारतीय नौदल सुरक्षा समितीचे अध्यक्ष के स्वामिनाथन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. अंदमान आणि निकोबार भागासह तिन्ही नौदल विभागांनी यावेळी सुरक्षा उपक्रम आणि आव्हानांबाबत थोडक्यात माहिती दिली. विषयपत्रिकेवर असलेल्या सुरक्षेशी संबंधित अनेक मुद्यांवर यावेळी चर्चा झाली. आण्विक सुरक्षा आणि विमानचालन सुरक्षा क्षेत्रातील तज्ञांशी यावेळी उपस्थितांनी संवाद साधला. यावेळी आयोजित सुरक्षा प्रदर्शनात आठ कंपन्यांनी अत्याधुनिक सुरक्षा आणि वैयक्तिक संरक्षण उपकरणे मांडली होती. या स्टॉलना उत्तम प्रतिसाद मिळाला.

CNS keynote Address and Review
4UYT.JPG)
PCIY.jpg)
***
M.Pange/P.Jambhekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2034728)
आगंतुक पटल : 122