सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
एमएसएमईमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी सर्वसमावेशक स्पर्धात्मकता कार्यशाळा पुण्यात संपन्न
संयुक्त सचिव आणि अन्य अधिकाऱ्यांनी एमएसएमई मंत्रालयाचे विविध उपक्रम केले अधोरेखित
Posted On:
19 JUL 2024 6:09PM by PIB Mumbai
पुणे, 19 जुलै 2024
जागतिक बँकेचे पाठबळ असलेल्या “रेझिंग अँड एक्सेलरेटिंग एमएसएमई परफॉर्मन्स” (RAMP कार्यक्रम) अंतर्गत सर्वसमावेशक स्पर्धात्मकता कार्यशाळेचे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई ) मंत्रालयाने 19 जुलै रोजी पुण्यात उद्घाटन केले. एमएसएमईंना त्यांचा विकास आणि स्पर्धात्मकतेसाठी उत्प्रेरित करण्याच्या दृष्टीने त्यांच्यात जागरूकता वाढवण्यासाठी नियोजित कार्यशाळांपैकी ही पहिली कार्यशाळा होती.

या कार्यशाळेचा उद्देश एमएसएमई मंत्रालयाच्या विविध उपक्रमांबद्दल जागरूकता वाढवणे आहे , ज्यात मंत्रालयाच्या विद्यमान योजना तसेच रॅम्प कार्यक्रमांतर्गत सुरू करण्यात आलेल्या नवीन उपक्रमांचा समावेश आहे. एमएसएमई चॅम्पियन्स योजना (झेड, लीन आणि एमएसएमई इनोव्हेटिव्ह), राष्ट्रीय अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती केंद्र योजना इ. एमएसएमईंना रॅम्प योजनेबद्दल माहिती देण्यात आली ज्यात - विलंबित पेमेंटसाठी ऑनलाइन विवाद निराकरण योजना, परिवर्तनासाठी एमएसएमई हरित गुंतवणूक आणि वित्तपुरवठा (एमएसई गिफ्ट योजना ), चक्रीय अर्थव्यवस्थेत प्रोत्साहन आणि गुंतवणुकीसाठी एमएसई योजना (एमएसई स्पाईस योजना) , एमएसएमई व्यापार सक्षमीकरण आणि विपणन (TEAM) उपक्रम , उद्यमी भारत पोर्टल आणि TReDS आणि ESG इत्यादी सारखे RAMP अंतर्गत समर्थित इतर उपक्रम यांचा समावेश होता.
JI94.jpeg)
कार्यक्रमाला अतीश कुमार सिंग (सहसचिव, एमएसएमई मंत्रालय), विनम्र मिश्रा (संचालक, एमएसएमई मंत्रालय) आणि इतरांनी संबोधित केले.
अतीश कुमार सिंह यांनी एमएसएमई परिसंस्थेचे बदलते स्वरूप आणि एमएसएमईंना पतपुरवठा , बाजारपेठ , तंत्रज्ञान, विलंबित पेमेंटची समस्या दूर करणे आणि हरित एमएसएमई साठी डिजिटल आणि तंत्रज्ञान विषयक उपायांद्वारे सहाय्य पुरवण्याच्या मंत्रालयाच्या उपक्रमांवर भर दिला.
राजेंद्र निंबाळकर, व्यवस्थापकीय संचालक, एमएसएसआयडीसी यांनी एमएसएमई मंत्रालयाने रॅम्प कार्यक्रमांतर्गत केलेले प्रयत्न आणि महाराष्ट्रातील एमएसएमईंना केलेल्या साहाय्याचे कौतुक केले. सुब्रांशू आचार्य (अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक - एनएसआयसी) यांनी एमएसएमईसाठी विपणन साखळी तयार करण्याच्या गरजेवर भर दिला. टी. कोशी यांनी एमएसएमई टीम उपक्रम आणि ओएनडीसीच्या माध्यमातून एमएसएमईसाठी डिजिटल बाजारपेठेत प्रवेश कसा वाढवता येईल याबद्दल उपस्थितांना संबोधित केले. आयआयएफसीएल प्रोजेक्ट्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी पलाश श्रीवास्तव यांनी एमएसएमई चा विकास आणि स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी रॅम्प कार्यक्रमांतर्गत मंत्रालयाच्या उपक्रमांबाबत उपस्थितांना संबोधित केले.

या कार्यक्रमात एमएसएमई , उद्योग संघटना, केंद्र आणि राज्य सरकार, बँका आणि वित्तीय संस्था, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि जागतिक बँक यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.
N.Chitale/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2034441)
Visitor Counter : 81