दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
55 वी डाक पेन्शन अदालत मुंबईत 20 ऑगस्ट 2024 रोजी
Posted On:
18 JUL 2024 4:46PM by PIB Mumbai
मुंबई, 18 जुलै 2024
मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई द्वारे टपाल विभागाच्या निवृत्तिवेतनधारकांसाठी / कुटुंब निवृत्तवेतनधारकांसाठी 55वी डाक पेंशन अदालत दिनांक 20-08-2024 रोजी 11.00 वाजता मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई -400 001 येथे आयोजित केली आहे.
महाराष्ट्र आणि गोवा राज्यांच्या टपाल विभागातूनजे कर्मचारी निवृत्त झाले आहेत / ज्यांचा सेवेत असताना मृत्यु झालेला आहे आणि ज्यांच्या निवृत्तिवेतन लाभाशी संबंधित तक्रारींची 3 महिन्यांच्या आत पूर्तता झालेली नाही अशा प्रकरणांचा डाक पेंशन अदालत मध्ये विचार केला जाईल.
पेंशन अदालतमध्ये पूर्णपणे कायदेशीर मुद्द्यांसह प्रकरणांचा उदा. वारसा प्रमाणपत्र, कल्पित पेन्शन, टीबीओपी / एमएसीपी पदोन्नती, वेतनश्रेणी वाढविणे आणि धोरणात्मक बाबींसह शिस्तपालन प्रकरणे आणि डी.पी.सी च्या पुनरावलोकनासाठी प्रलंबित प्रकरणांचा विचार केला जाणार नाही. निवृत्तिवेतनधारक खाली दिलेल्या प्रपत्रामध्ये आपले अर्ज तीन प्रतींमध्ये प्रति, लेखा अधिकारी, अदालत, मुख्य पोस्टमास्तर जनरल कार्यालय, महाराष्ट्र सर्कल, न्यु एनेक्स भवन, चौथा मजला, मुंबई – 400 001 ला 31-07-2024 रोजी किंवा यापूर्वी वैयक्तिक रित्या (इतरांच्या वतीने नाही ) पाठवू शकतात.
31-07-2024 च्या नंतर मिळालेले अर्ज पेंशन अदालतमध्ये विचारासाठी घेतले जाणार नाहीत.
भारतीय डाक विभाग
डाक पेंशन अदालतसाठी अर्ज प्रपत्र
क्र.
|
विषय
|
वैयक्तिक / निवृत्तिवेतनधारक यांच्याकडून भरण्यात येणारा तपशील
|
1.
|
निवृत्ती / मृत्युच्यावेळी पदनामसह निवृत्तिधारकाचे / कुटुंब निवृत्तिधारकाचे नाव
|
|
2.
|
कार्यालयाचे नाव जिथून निवृत्त झाले आहेत आणि निवृत्तीची तारीख
|
|
3
|
पीपीओ क्रमांक
|
|
4
|
पोस्टऑफिस आणि डिव्हीजन चे नाव जिथे पेंशन घेतली जात आहे
|
|
5
|
निवृत्तिवेतनधारकाचा पोस्टाचा पत्ता
मोबाईल नंबर सह
|
|
6
|
थोडक्यात तक्रार
(जर आवश्यकता असेल तर तपशीलासह अर्ज जोडा.)
|
|
7
|
व्यक्ती / निवृत्तिवेतनधारकांची सही आणि दिनांक
|
|
N.Chitale/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2034032)
Visitor Counter : 53