विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी अमेरिकन चेंबर ऑफ इंडियाच्या ‘आरोग्य सेवा शिखर परिषदेला केले संबोधित; सुलभ, परवडणाऱ्या आरोग्यसेवेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर दिला भर

Posted On: 17 JUL 2024 3:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 जुलै 2024

 

नवी दिल्ली येथील हॉटेल ताज येथे “अमेरिकन चेंबर ऑफ इंडिया” (AMCHAM) च्या दुसऱ्या “आरोग्य सेवा शिखर परिषदेला केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी संबोधित केले. यावेळी आपल्या भाषणात त्यांनी सुलभ तसेच परवडणाऱ्या आरोग्यसेवेसाठी अत्याधुनिक  तंत्रज्ञानाच्या वापरावर भर दिला.

भारत जगातील सर्वात किफायतशीर आणि परिणामकारकतेवर आधारित जैव-उत्पादन केंद्रांपैकी एक असून किफायतशीर आरोग्य सेवेचे ठिकाण  आणि जगातील अव्वल 6 जैव-उत्पादक देशांपैकी एक असल्याचे  डॉ. जितेंद्र सिंह यांनी नमूद  केले.

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), भूविज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री, अणुऊर्जा विभाग आणि अंतराळ विभाग, कार्मिक राज्यमंत्री, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी सत्राच्या सुरुवातीला केलेल्या भाषणात महत्त्वपूर्ण आरोग्य सेवा शिखर परिषदेचे आयोजन केल्याबद्दल आणि  भारतातील आरोग्यसेवेसाठी सरकारचे धोरण स्पष्ट करण्यासाठी आमंत्रित केल्याबद्दल अमेरिकन चेंबर ऑफ इंडियाचे आभार मानले. या शिखर परिषदेत उपस्थितांमध्ये सहभागी होऊन आरोग्य या विषयावर चर्चा करण्याची संधी मिळाली याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

डॉ . सिंह यांनी शिखर परिषदेच्या ‘अभिनव  आणि सुलभ आरोग्यसेवेला गती देण्यासाठी: तंत्रज्ञान परिवर्तन’ या संकल्पनेची प्रशंसा केली. ही संकल्पना भारतातील समकालीन आरोग्य समस्या आणि सर्वांना परवडणारी आरोग्य सेवा सुनिश्चित करण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांशी अगदी प्रासंगिक आहे.

   

आरोग्यसेवा क्षेत्रातील अमेरिका-भारत भागीदारी मजबूत करण्यावर विचारमंथन करण्यासाठी प्रमुख भागधारक, आरोग्यसेवा व्यावसायिक, तंत्रज्ञान तज्ञ, धोरणकर्ते आणि उद्योग प्रमुख यांना एकत्र आणणारी या स्वरूपाची शिखर परिषद महत्त्वपूर्ण असल्याचे  डॉ. जितेंद्र सिंह यांनी अधोरेखित केले.

 

* * *

S.Kane/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2033834) Visitor Counter : 46