ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
मानकीकरणाद्वारे तरुणांचे सक्षमीकरण: बीआयएस द्वारे स्टँडर्ड क्लबच्या मार्गदर्शकांसाठी निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन
Posted On:
02 JUL 2024 12:04PM by PIB Mumbai
बीआयएस अर्थात भारतीय मानक ब्युरोच्या मुंबई शाखा कार्यालय-II ने अलीकडेच स्टँडर्ड क्लब मार्गदर्शकांसाठी दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता. बीआयएस मुंबईने 27 आणि 28 जून 2024 रोजी आयोजित केलेला अशाप्रकारचा हा नववा उपक्रम होता. विशेषतः ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील मार्गदर्शकांकरता याचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्रात मुंबईतील गोल्डफिंच हॉटेल येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमात विविध शाळा/महाविद्यालयांमधील 23 मार्गदर्शकांचा सक्रिय सहभाग होता.
प्रशिक्षण कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये :
स्वागतपर भाषण
बीआयएसचे उपमहासंचालक संजय गोस्वामी यांनी गुणवत्ता आणि मानकीकरण यांचे महत्व विशद केले तसेच त्यांचे दैनंदिन जीवनातील संदर्भ आणि लाभ याविषयी माहिती दिली. याशिवाय त्यांनी सोन्याचे हॉलमार्किंग आणि अनिवार्य उत्पादनांसाठी गुणवत्ता नियंत्रण आदेश यांविषयी तसेच जीवनाचा दर्जा सुधारण्याबाबतच्या बीआयएसच्या उपक्रमांवर प्रकाश टाकला.
उद्दिष्टे आणि बीआयएसचे उपक्रम:
एफ श्रेणीचे वैज्ञानिक, मुंबई शाखा कार्यालय-II चे वरिष्ठ संचालक आणि प्रमुख संजय विज यांनी यांनी कार्यक्रमाची उद्दिष्टे आणि विद्यार्थ्यांमध्ये मानकीकरण आणि गुणवत्तेबाबत सजगता निर्माण करण्यासाठी बीआयएस च्या उपक्रमांवर प्रकाश टाकला.
बीआयएसच्या उपक्रमांचा आढावा
सी श्रेणीचे शास्त्रज्ञ आणि बीआयएस मुंबईचे उपसंचालक टी अर्जुन यांनी मानकांच्या तपशीलवार अभ्यासात बीआयएसच्या उपक्रमांचा आढावा घेतला.
स्टँडर्ड क्लब/बीआयएस संकेतस्थळ आणि केअर ॲपचे उपक्रम:
स्टँडर्ड प्रमोशन ऑफिसर पुष्पेंद्र मिश्रा यांनी स्टँडर्ड क्लबच्या निर्मितीसाठी मार्गदर्शक तत्त्वे सविस्तरपणे सांगितली. क्लबच्या मार्गदर्शकांची भूमिका आणि जबाबदारी याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. बीआयएस ने संपूर्ण देशभरात यशस्वीरीत्या 10,500 स्टँडर्ड क्लब स्थापन केले आहेत, असे ते म्हणाले. प्रशिक्षण कार्यक्रमाचा अविभाज्य भाग बनवलेल्या गटांनी परस्पर सहभागाद्वारे केलेल्या सादरीकरणाच्या माध्यमातून मार्गदर्शकांनी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये कोणते उपक्रम हाती घ्यावेत याविषयीचे प्रत्यक्ष मार्गदर्शन देण्यात आले.
गट उपक्रम आणि कार्यशाळा:
के.सी. कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगचे सहयोगी प्राध्यापक, रवी प्रकाश आणि जेफायर टॉयच्या गुणवत्ता प्रमुख प्रियंका लोखंडे, यांनी कार्यक्रमादरम्यान घेण्यात आलेले गट उपक्रम आणि मानक लेखन कार्यशाळा यांचे पर्यवेक्षण केले.
हा निवासी प्रशिक्षण कार्यक्रम विशेषतः तरुणांमध्ये गुणवत्ता आणि मानकीकरणाची संस्कृती वाढवणे आणि गुणवत्ता-जागरूक राष्ट्र निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी सुरू असलेल्या बीआयएस च्या प्रयत्नांचा एक भाग आहे.
***
S.Tupe/B.Sontakke/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2030259)
Visitor Counter : 43