माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

18 व्या मिफ्फमध्ये लिथुआनियन चित्रपट निर्माते ऑड्रियस स्टोनीस यांनी माहितीपट निर्मितीचे खरे सार उलगडून सांगितले


वास्तव ही माहितीपट बनवण्याची एकमेव गुरुकिल्ली आहे: ऑड्रिअस स्टोनिस

Posted On: 18 JUN 2024 10:35PM by PIB Mumbai

मुंबई, 18 जून 2024

 

“वास्तवापेक्षा अधिक नाट्यमय काहीही नाही; तेच मनोरंजक आहे. वास्तव ही माहितीपट बनवण्याची एकमेव गुरुकिल्ली आहे, असे लिथुआनियन अकादमी ऑफ म्युझिक अँड थिएटरचे प्राध्यापक, प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माता ऑड्रिअस स्टोनीस म्हणाले. 18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज 'प्रेरणादायी कथा : अस्सलपणा आणि कल्पकता ' या सत्रादरम्यान त्यांनी आपले विचार मांडले.

डॉक्टर ऑफ आर्ट्स आणि लिथुआनियन राष्ट्रीय संस्कृती आणि कला पुरस्कार विजेते ऑड्रिअस स्टोनिस यांनी त्यांच्या कार्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रशंसा मिळवली आहे. त्यांचा "अर्थ ऑफ द ब्लाइंड" माहितीपट 1992 मध्ये युरोपियन फिल्म अकादमीद्वारा वर्षातील सर्वोत्कृष्ट युरोपियन माहितीपट ठरला होता. 1989 पासून, स्टोनीसने 20 हून अधिक आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त सर्जनशील माहितीपट आणि 400 हून अधिक दूरचित्रवाणी माहितीपट तयार केले आहेत.

माहितीपट आणि चित्रपट रसिकांना संबोधित करताना, स्टोनीस यांनी चित्रपट निर्मितीमध्ये सर्जनशीलता आणि अनोखेपणाचे महत्त्व विशद केले. वास्तव हा कोणत्याही माहितीपटाचा गाभा आणि गुरुकिल्ली आहे हे त्यांनी अधोरेखित केले. चित्रपट निर्मात्यांनी अनोखे कथानक आणि नवीन तंत्रज्ञानासह वास्तव मांडण्यावर भर दिला पाहिजे.

  

जेव्हा एक दिग्दर्शक एखाद्याच्या जीवनावर चित्रपट बनवतो तेव्हा तो खरं तर त्याच्या स्वत: च्या जीवनातील अनुभवांवर आधारित चित्रपट बनवतो. या प्रयत्नात दिग्दर्शक यशस्वी झाला, तर प्रेक्षकांना वाटते की हा चित्रपट त्यांच्या स्वतःच्या जीवनाचे प्रतिबिंबित करतो, ज्यामुळे तो त्यांना अधिक भावतो.

स्टोनीस यांनी चित्रपट निर्मात्यांना त्यांच्या चित्रपटांमध्ये प्रत्यक्षपणे न दाखवता सगळे काही सांगण्याचा सल्ला दिला. “तुमच्या चित्रपटाची प्रत्येक फ्रेम बोलली पाहिजे. कुठलीही भाषा असो, संगीताप्रमाणेच त्याचा तुमच्या जीवनावर परिणाम झाला पाहिजे,” असे त्यांनी नमूद केले.

 

* * *

PIB Team MIFF | M.Chopade/S.Kane/D.Rane | 40

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2026431) Visitor Counter : 51