माहिती आणि प्रसारण मंत्रालय

मिफ्फ पॅनेलने घेतला आशय निर्मिती आणि यशाच्या नियोजनाच्या लोकशाहीकरणाचा वेध


आशय निर्मितीच्या यशाच्या विविध मार्गांना मिफ्फमधील चर्चांनी केले अधोरेखित

Posted On: 16 JUN 2024 10:07PM by PIB Mumbai

मुंबई, 16 जून 2024

 

मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024 मध्ये (मिफ्फ) आज “ फ्रॉम ऍडव्हेंचर टू रेव्हेन्यूः सक्सेस स्ट्रॅटेजिज फॉर कंटेंट क्रिएटर्स” या पॅनेल  चर्चेचे आयोजन करण्यात आले. विविध मंचांनी आशय निर्मितीचे कशा प्रकारे लोकशाहीकरण केले आहे, ज्यामुळे जीवनाच्या सर्व क्षेत्रातील सृजनकर्त्यांना त्यांच्या कथा सामाईक करता आल्या,  यावर या चर्चेचा भर होता. अस्सल भारतीय आशयाची वाढणारी मागणी पॅनेलिस्टनी अधोरेखित केली आणि नव्या आशयाच्या निर्मात्यांच्या यशाच्या धोरणांबाबतचा दृष्टीकोन मांडला.  

यूट्युब मुव्ही कंटेंट पार्टनरशिपच्या प्रमुख नम्रता राजकुमार, द व्हायरल फिव्हर प्रॉडक्शन्सचे अध्यक्ष विजय कोशी, गोप्रो इंडियाचे मार्केटिंग अँड कम्युनिकेशन्सचे संचालक यतिश सुवर्णा, शेफमधून छायाचित्रकार बनलेले यश राणे, ऍथलीट आणि काश्मीरमधील साहसी चित्रपटनिर्माते रिझा अली, हैदराबादचे यूट्युबर साई तेजा या पॅनेल  चर्चेत सहभागी झाले. तर अभिनेते, सीबीएफसीचे निर्माते आणि सदस्य वाणी त्रिपाठी टिकू यांनी सूत्रसंचालन केले.  

यूट्युबवर नव्या आशय निर्मात्यांना असलेल्या संधींविषयी बोलताना नम्रता राजकुमार म्हणाल्या की यूट्युब हा एक असा मंच आहे ज्यामध्ये लघु, दीर्घ आणि अती दीर्घ अशा विविध स्वरुपांमध्ये आशय निर्मिती करण्याची क्षमता आहे.

यूट्युबसारख्या मंचांनी प्रत्यक्षात आशय निर्मितीचे लोकशाहीकरण केले आहे कारण ते कोणत्याही ठिकाणच्या कोणत्याही व्यक्तीला सृजनशील बनण्याची सुविधा उपलब्ध करून देतात. याचे उदाहरण म्हणजे केरळमधील एका गावातील एका फॅमिली मॅनसारख्या सृजनकाराकडे 5 कोटींपेक्षा जास्त सदस्य आहेत. आमच्याकडे शेतकरी आहेत, ट्रक  चालक आहेत जे मोठी सदस्य संख्या असलेले आमचे आशय निर्माते आहेत. प्रत्येकाकडे सांगण्यासारखी काही तरी कथा आहे आणि यूट्युब या सर्वांसाठी एकदम उत्तम मंच आहे.

या चर्चेमध्ये विजय कोशी यांनी त्यांच्या टीव्हीएफ या निर्मिती गृहाच्या कथेविषयी सांगितले. ते म्हणाले टीव्हीएफचा प्रवास सर्व नामांकित निर्मिती संस्थांकडून मिळालेल्या नकारापासून  सुरू झाला. त्यानंतर आम्ही यूट्युब या मंचाचा वापर आमच्या स्वतःचे चॅनेल त्यावर तयार  करायचा निर्णय घेतला. आज त्यावर 11 टीव्ही शोज आहेत ज्यांचे भारतातील सर्वात जास्त आयएमडीबी मानांकन आहे. त्यापैकी 7 ची निर्मिती टीव्हीएफने केली आहे आणि त्यापैकी 5 हे सर्वस्वी यूट्युब शोज आहेत. पंचायत या वेब सीरीजचा उल्लेख करत त्यांनी सांगितले. त्यांनी अधिकाधिक भारतीय प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण भारतीय आशयाची निर्मिती  करण्याचे देखील नव्या निर्मात्यांना आवाहन केले.

यतिश सुवर्णा यांनी गोप्रोची कथा सांगितली. ते म्हणाले गो प्रो कॅमेऱ्याची निर्मिती सर्वात  पहिल्यांदा 23 वर्षांपूर्वी झाली होती. यूट्युब युगामध्ये प्रत्येक आशय निर्मात्यासाठी हे कॅमेरे गेम चेंजर ठरले आहेत. त्यांनी लहान स्वरुपाच्या व्हिडिओ आशयात क्रांती घडवली आहे आणि व्हीलॉगिंग आणि ब्लॉगिंग अनुभव लक्ष वेधून घेणाऱ्या दृश्यांसह समृद्ध केला आहे.  

या चर्चेमध्ये पुढे यश राणे, रिझा अली, साई तेजा यांनी देखील चॅनेलची निर्मिती, व्हिडिओ अपलोड करणे आणि दर्शकांचे अभिप्राय याविषयीचे अनुभव सामाईक केले. ते म्हणाले की जर तुमचे काम अस्सल आणि वैशिष्ट्यपूर्ण असेल तर तुम्हाला प्रेक्षकांकडून नक्कीच सकारात्मक प्रतिसाद मिळेल.

 

* * *

PIB Team MIFF | S.Kane/S.Patil/D.Rane | 20

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2025810) Visitor Counter : 28


Read this release in: English , Urdu , Hindi , Hindi_MP