माहिती आणि प्रसारण मंत्रालय
18व्या मिफ्फ मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटांचा अनुभव घेण्यासाठी पुणे सज्ज
Posted On:
14 JUN 2024 7:12PM by PIB Mumbai
पुणे, 14 जून 2024
एनएफडीसी आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 18 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला लवकरच प्रारंभ होत असताना, पुणे शहरासाठी एक खास पर्वणी आहे.
देशभरातील सर्वोत्कृष्ट माहितीपट, लघुपट आणि ॲनिमेशन चित्रपटांची ओळख करून देण्याच्या उद्देशाने पुणे, कोलकाता, दिल्ली आणि चेन्नई या शहरांमध्ये विशेष रेड कार्पेट प्रीमियर आणि चित्रपटांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
पुणेस्थित चित्रपट निर्मात्यांच्या चित्रपटांच्या प्रदर्शनाव्यतिरिक्त, महोत्सवात शहरातील एनएफडीसी - नॅशनल फिल्म आर्काइव्ह ऑफ इंडिया येथे "बिली आणि मॉली - अन ऍन ऑटर लव्हस्टोरी" या उदघाटन चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग देखील जाईल.
शहरात सर्वोत्कृष्ट चित्रपट आणण्याच्या उद्देशाने, 18 व्या मिफ्फ मध्ये 15 जून ते 21 जून या कालावधीत एनएफडीसी-एनएफएआय येथे अधिकृत निवड झालेले चित्रपट दररोज प्रदर्शित केले जाणार आहेत . पुण्यात प्रदर्शित होणाऱ्या श्रेणींमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात निवड झालेल्या काही अधिकृत चित्रपटांमध्ये सर्वनिक कौरचे “अगेन्स्ट द टाईड”, रॉजियर कॅपियरचे “ग्लास माय अनफुलफिल्ड लाईफ ”, विघ्नेश कुमुलाईचे “करपारा” आणि होमर हर्मनचा “आय एम नॉट” यांचा समावेश असेल. याशिवाय अंकित पोगुला यांचा भेड चाल, शुभांगी राजन सावंत यांचा सहस्त्रसूर्य सावरकर आणि सुहास सीताराम कर्णेकर यांचा आठवणीतल्या पाऊलखुणा हे तीन मराठी चित्रपट पुण्यात प्रदर्शित होणार आहेत.
सर्वोत्कृष्ट चित्रपटांचा उत्सव साजरा करताना, 18 व्या मिफ्फ मध्ये पुण्यातील चित्रपट दिग्दर्शकांचे चित्रपट देखील पहायला मिळतील , ज्यांच्या चित्रपटांची महोत्सवात अधिकृत निवड झाली आहे . यापैकी काही चित्रपटांमध्ये साईनाथ एस. उसकईकर यांचा गुंतता हृदय हे (एंटँगल्ड) आणि कान चित्रपट महोत्सव विजेते चिदानंद नाईक यांचा “सनफ्लॉवर्स वेअर द फर्स्ट वन टू नो” यांचा समावेश आहे, हे दोन्ही लघुपटांच्या राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतील.
त्याचप्रमाणे अरिंदम किशोर दत्ता यांचा “कनखुआ” हा ॲनिमेशन श्रेणीतील राष्ट्रीय स्पर्धेत, प्रसाद रमेश भुजबळ यांचा “भय” हा राष्ट्रीय लघुकथा स्पर्धेच्या श्रेणीत आणि देवेश रंगनाथ कणसे यांचा “म्हातारा डोंगर” हा नॅशनल प्रिझम-स्टुडन्ट शॉर्ट फिल्म फिक्शन श्रेणीचा भाग म्हणून दाखवण्यात येणार आहे.
18 व्या मिफ्फ चे आयोजन 15 ते 21 जून 2024 दरम्यान होणार आहे.
PIB Team MIFF | S.Patil/S.Kane/P.Malandkar | 07
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2025383)
Visitor Counter : 94