कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जम्मूकडे लक्ष वळवण्याचा दहशतवादी डाव फोल ठरणार: डॉ जितेंद्र सिंह

प्रविष्टि तिथि: 12 JUN 2024 9:11PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 जून 2024


काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलांच्या कारवाईमुळे हताश झालेले दहशतवादी पलायन करून जम्मू प्रदेशात त्यांच्या कारवायांवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र जम्मू प्रदेशाकडे लक्ष वळवण्याचा दहशतवादी डाव फोल ठरेल असे प्रतिपादन पंतप्रधान  कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी केले.

येथील जीएमसी रुग्णालयात जखमी नागरिक ओम प्रकाश यांची भेट घेतल्यानंतर आणि दिवंगत कमलजीत शर्मा यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, सीमेपलीकडून दहशतवादाला पाठबळ देणाऱ्यांना मूलभूत फरक लक्षात येत नाही कि ते स्थानिकांकडून ज्या प्रत्यक्ष पाठिंब्याची अपेक्षा करत आहेत तो त्यांना कधीच मिळू शकणार नाही.

पंतप्रधान मोदींचे दहशतवादाबाबत शून्य सहिष्णुतेचे धोरण म्हणजे सरकारच्या दृष्टिकोनाचा मूलमंत्र म्हणून उल्लेख करून डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, अशा घटना दहशतवाद संपुष्टात  येण्याच्या टप्प्यात आल्याचे आणि दहशतवादी निष्प्रभ होत असल्याचेही द्योतक आहेत.

नागरी प्रशासन आणि सुरक्षा दले यांच्यातील समन्वयाचे कौतुक करून डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, “सुरक्षा तज्ञांकडून आज प्राप्त झालेल्या काही महत्त्वाच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांसमोर ठेवल्या जातील आणि संभाव्य दहशतवादी कारवायांना आणखी प्रतिबंधक ठरू शकतील."

अमरजीत शर्मा यांच्या शोकग्रस्त कुटुंबाला भेट देताना डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, "अशा घटनांनंतर अपेक्षित असलेल्यापेक्षा जास्त दिलासा, सहाय्य आणि मदत दिली जाईल."

 
N.Chitale/V.Joshi/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(रिलीज़ आईडी: 2024848) आगंतुक पटल : 119
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Hindi_MP , Punjabi