Posted On:
08 JUN 2024 2:58PM by PIB Mumbai
नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच:
• नैऋत्य मोसमी पाऊस मध्यवर्ती अरबी समुद्र, दक्षिण महाराष्ट्र, तेलंगणचे आणखी काही भाग आणि दक्षिण छत्तीसगड आणि दक्षिण ओदिशाचे काही भाग आणि आंध्र प्रदेश किनारपट्टीच्या आणखी काही भागात आज 8 जून 2024 रोजी पुढे सरकला आहे.
• मध्यवर्ती अरबी समुद्राच्या उर्वरित भागांमध्ये, महाराष्ट्र (मुंबईसह) आणि तेलंगणच्या आणखी काही भागात पुढील 2-3 दिवसात नैऋत्य मोसमी पावसाला आगेकूच करण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे.
• वातावरणातील तपांबराच्या तळाच्या आणि मध्यम पातळीवर 16° उत्तरेदरम्यान एक पट्टा तयार झाला आहे. महाराष्ट्र ते उत्तर केरळपर्यंत तपांबराच्या तळाच्या पातळीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. या प्रभावाखालीः
• पुढील पाच दिवसात कोकण आणि गोव्यात, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कर्नाटक आणि केरळ, माहे, लक्षद्वीप मध्ये बऱ्याच भागात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह(40-50 किमी/तास) हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता, आंध्र प्रदेश किनारपट्टी आणि याणम्, रायलसीमा, तेलंगण, तामिळनाडू, पुदुच्चेरी आणि काराईकलमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता.
• कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र, कर्नाटक किनारपट्टीवर तुरळक ठिकाणी 12 जून रोजी मुसळधार ते अतिमुसळधार, 10 ते 12 जून दरम्यान केरळ आणि माहेमध्ये, 8 ते 10 जून दरम्यान दक्षिण कर्नाटकच्या अंतर्गत भागात; मराठवाडा, तामिळनाडू, पुदुच्चेरी आणि कराईकल आणि तेलंगणमध्ये 8 ते 10 जून दरम्यान, मध्य महाराष्ट्रात 9 ते 11 जूनदरम्यान, कर्नाटक किनारपट्टीवर 8 ते 9 जून दरम्यान आणि उत्तरेकडील कर्नाटकच्या अंतर्गत भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
पुढील पाच दिवस उष्णतेची लाट, रात्रीचे उबदार वातावरण आणि उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा
• ईशान्य मध्य प्रदेश, झारखंड, बिहार, पश्चिम बंगालचा गंगेच्या खोऱ्यातील भाग या ठिकाणी तुरळक क्षेत्रात 8 ते 12 जूनदरम्यान, ओदिशा, पंजाब,हरयाणा येथे 9 ते 12 जून दरम्यान, जम्मू काश्मीर लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश येथे 10 ते 12 जून दरम्यान उष्णतेची लाट असेल .
• 8 जून रोजी उत्तर प्रदेशात तुरळक भागांमध्ये उष्णतेची लाट असेल आणि या भागातील काही ठिकाणी 9 ते 12 जून दरम्यान उष्णतेची आणि अतितीव्र उष्णतेची लाट असेल.
***
S.Kane/S.Patil/P.Kor