दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ट्रायच्या नावाने फसवणूक

Posted On: 06 JUN 2024 7:47PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 6 जून 2024

 

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) च्या निदर्शनास आले आहे की नागरिकांना करण्यात येणारे फसवे व्हॉट्सॲप संदेश, एसएमएस आणि व्हॉईस कॉल हे ट्रायचे असल्याचा दावा करण्यात येत आहे. ट्रायच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधिकृत संप्रेषणाप्रमाणे बनवलेल्या बनावट नोटिसांचा वापर गुन्हेगार करत आहेत.

या नोटिस, प्राप्तकर्त्याच्या मोबाइल नंबरशी संबंधित बेकायदेशीर कृत्यांचा खोटा आरोप करतात आणि कायदेशीर अंमलबजावणीकरिता संपर्क साधण्यासाठी किंवा सेवा संपुष्टात आणण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणतात. नागरिकांनी प्रतिसाद न दिल्यास मोबाईल क्रमांक खंडित करण्यात येईल, अशी धमकीही दिली जात आहे. काही वेळा, विद्वेषपूर्ण कृती करणारे मालवेअर स्थापित करण्यासाठी किंवा फिशिंग लिंकवर क्लिक करून लोकांना फसवण्याचा प्रयत्न करू शकतात.

संदेश किंवा अधिकृत सूचनांद्वारे मोबाईल क्रमांक खंडित करण्याबाबत ट्राय कधीही संप्रेषण सुरू करत नाही. तसेच अशा हेतूने ग्राहकांशी संपर्क साधण्यासाठी त्याने कोणत्याही तिसऱ्या एजन्सीला अधिकृत केलेले नाही. म्हणून, कोणत्याही प्रकारचे संप्रेषण (कॉल, संदेश किंवा सूचना) ट्राय कडून असल्याचा दावा करणे आणि मोबाईल सेवा खंडित करण्याची धमकी देणे हा संभाव्य फसवणूकीचा प्रयत्न मानला जावा.

सायबर गुन्हे आणि आर्थिक फसवणुकीसाठी दूरसंचार संसाधनांचा गैरवापर रोखण्यासाठी, नागरिकांना दूरसंचार विभागाच्या संचार साथी प्लॅटफॉर्मवर चक्षू सुविधेद्वारे संशयित फसव्या संप्रेषणाची तक्रार करण्यास प्रोत्साहित केले जाते. या प्लॅटफॉर्मवर https://sancharsaathi.gov.in/sfc/ द्वारे प्रवेश करता येईल. सायबर गुन्ह्याची पुष्टी झाली असल्यास पीडितांनी सायबर क्राइम हेल्पलाइन नंबर ‘1930’ वर किंवा https://cybercrime.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर घटनेची तक्रार करावी.

 

* * *

S.Kane/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2023296) Visitor Counter : 74


Read this release in: English , Urdu , Hindi , Hindi_MP