नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाच्या स्थापनेला 35 वर्षे झाल्यानिमित्त महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली विशेष कार्यक्रम

Posted On: 30 MAY 2024 7:05PM by PIB Mumbai

मुंबई, 30 मे 2024

 

जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण या भारतातील प्रमुख कंटेनर बंदराने  26 मे 1989 ला स्थापना झाल्यापासून उत्कृष्टतेची 35 वर्षे पूर्ण केली आहेत. यानिमित्त  महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील हॉटेल ताजमहाल येथे 30 मे 2024 रोजी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. "समृद्धी बंदर" या संकल्पनेवर हा कार्यक्रम आधारित होता.

भारताच्या बंदरातील कामकाजाचा कायापालट करण्यात हे बंदर सातत्याने आघाडीवर असून 1989 मध्ये त्याची स्थापना झाल्यापासून, ते भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर बनले आहे. बंदराने अलीकडेच 2023-24 या आर्थिक वर्षात 6.43 दशलक्ष TEUs ची आतापर्यंतची सर्वोच्च थ्रूपुट नोंदवून ऐतिहासिक टप्पा गाठला. डिजिटलायझेशन, ऑटोमेशन, वचनबद्धता आणि हरित बंदरे  उपक्रमांमध्ये बंदराच्या धोरणात्मक पुढाकाराने नवे आयाम  स्थापित केले आहेत. शाश्वतता आणि सामुदायिक विकासासाठी वचनबद्धता देखील या बंदराच्या  यशामध्ये एक महत्त्वपूर्ण घटक आहे.

राष्ट्रगीत आणि राज्य गीताने कार्यक्रमाची  सुरुवात झाली. राज्यपालांनी मुख्य पोस्ट मास्टर जनरल यांच्या उपस्थितीत जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणा चे विशेष कव्हर आणि कॉर्पोरेट कस्टमाइज्ड माय स्टॅम्प जारी केला, त्यानंतर कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले. वाढवण येथील ग्रीनफील्ड बंदराच्या विकासासाठी JNPA आणि PSA (भारत) आणि JNPA आणि CMACGM यांच्यात एकूण रु.40,000 कोटी च्या दोन सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. यानंतर, राज्यपालांनी पंचवीस जेएनपीए भागधारक आणि कर्मचाऱ्यांचा, बंदराच्या यशातल्या योगदानाची दखल घेऊन सत्कार केला.

  

जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष उन्मेष शरद वाघ म्हणाले, “या बंदराच्या  प्रभावी प्रवासाची 35 वर्षे पूर्ण होत असताना, आम्ही भारताच्या सागरी पायाभूत सुविधांना पुढे नेण्याच्या आमच्या कामगिरीचे अवलोकन करतो. याव्यतिरिक्त, राज्यपालांच्या विनंतीला प्रतिसाद देत, जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण येत्या 2 महिन्यांत 38 एकलव्य मॉडेल शाळांना 1000 संगणक आणि 100 टॅब्लेटसह सुसज्ज करण्यासाठी 3.5 कोटी रुपये देणार आहे. पुढील वर्षी एप्रिलपर्यंत, BMCT टर्मिनलच्या जोडणीसह, या बंदराची क्षमता 10.4 दशलक्ष TEUs पर्यंत पोहोचेल आणि भारतातील सर्वात मोठे बंदर म्हणून त्याचे स्थान मजबूत होईल.”

 

जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाबद्दल:

जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (JNPA) हे भारतातील प्रमुख कंटेनर हाताळणी बंदरांपैकी एक आहे. 26 मे 1989 रोजी स्थापन झाल्यापासून, हे बंदर बल्क कार्गो टर्मिनलमधून देशातील प्रमुख कंटेनर बंदर बनले आहे. सध्या, जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण पाच कंटेनर टर्मिनल्स चालवते.

277 हेक्टर जमिनीवर वसलेले, हे बंदर  भारतातील निर्यात-केंद्रित उद्योगांना चालना देण्यासाठी, अत्याधुनिक पायाभूत सुविधांसह, काळजीपूर्वक डिझाइन केलेले बहु-उत्पादन सेझ चालवते.

 

* * *

(Source: JNPA) | PIB Mumbai | N.Chitale/PR/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2022245) Visitor Counter : 134


Read this release in: English