वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

मुक्त व्यापार करार धोरण आणि व्यापार वाटाघाटीसाठी मानक संचालन प्रक्रियेबाबत वाणिज्य विभागाचे चिंतन शिबीर


मुक्त व्यापार करार (एफटीए)चे आर्थिक मूल्यमापन आणि मॉडेलिंग, एफटीएमधील सेवा आणि डिजिटल व्यापार आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, महत्वपूर्ण खनिजांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांच्या समस्या दूर करण्यासाठी भारताच्या एफटीएचा लाभ उठवण्याबाबत झाली चर्चा

Posted On: 28 MAY 2024 5:28PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 मे 2024

 

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या वाणिज्य विभागाने व्यापार आणि गुंतवणूक कायदे केंद्र (सीटीआयएल), भारतीय परदेशी व्यापार संस्था, नवी दिल्ली यांच्या सहकार्याने 16 ते 17 मे 2024 दरम्यान मुक्त व्यापार करार रणनीती आणि व्यापार वाटाघाटींसाठी मानक संचालन प्रक्रियेबाबत राजस्थान येथील नीमराना येथे  चिंतन शिबीर आयोजित केले होते.

दोन दिवसीय चिंतन शिबिरामध्ये भारताद्वारे मुक्त व्यापार करार (एफटीएएस) च्या वाटाघाटी आणि अशा वाटाघाटींसाठी अवलंबली जाणारी  भूमिका आणि त्यासंबंधीचे धोरण याबद्दलच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. उपस्थितांनी एफटीए वाटाघाटींसाठी मानक संचालन कार्यप्रणाली,व्यापार वाटाघाटींसाठी क्षमता निर्मिती आणि संसाधन व्यवस्थापन तसेच आधुनिक एफटीए अंतर्गत काही समकालीन समस्या जसे की श्रम, पर्यावरण, लैंगिक समानता इत्यादींवर देखील चर्चा केली.

वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी एफटीए वाटाघाटींमध्ये भारताच्या भविष्यातील सहभागासाठी एक धोरणात्मक मार्ग तयार करण्याचा प्रयत्न करत या चिंतन शिबिराचे नेतृत्व केले. या कार्यक्रमात केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये, विभाग आणि संस्थांमधील भारताच्या एफटीए वाटाघाटींमध्ये सहभागी असलेल्या वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. या कार्यक्रमातील मुख्य वक्त्यांमध्ये भारत सरकारचे माजी वरिष्ठ अधिकारी, एफटीए वाटाघाटीतील प्रतिष्ठित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ञ, आदरणीय शिक्षणतज्ज्ञ आणि अनुभवी कायदे व्यावसायिकांचा समावेश होता. त्यांचे सादरीकरण बहुमूल्य विचार देणारे  आणि ज्ञान समृद्ध करणारे होते.

 

* * *

S.Kane/G.Deoda/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2021959) Visitor Counter : 56


Read this release in: Gujarati , Tamil