भारतीय निवडणूक आयोग

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या 5 व्या टप्प्यात मुंबईतील सहा जागांसह महाराष्ट्रातील 13 मतदारसंघांमध्ये होत आहे मतदान


नामांकित व्यक्ती,ज्येष्ठ नागरिक आणि नवमतदारांचा मतदानात उत्साहपूर्ण सहभाग

Posted On: 20 MAY 2024 6:06PM by PIB Mumbai

 मुंबई ,20 मे  2024

 

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या 5 व्या टप्प्यात आज 8 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील 49 लोकसभा मतदारसंघात  मतदान सुरु आहे.लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या 5 व्या टप्प्यात मुंबईतील सहा जागांसह महाराष्ट्रातील 13 मतदारसंघात आज मतदान होत आहे.राज्यात आज मतदान होत असलेले मतदारसंघ पुढीलप्रमाणे - मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण, ठाणे, कल्याण, पालघर, धुळे, दिंडोरी, नाशिक आणि भिवंडी.


आजच्या  मतदानाची काही क्षणचित्रे -


देशाच्या आर्थिक राजधानीत रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज सकाळी त्यांच्या कुटुंबासह मतदान केले.


लोकशाहीच्या उत्सवात शहरातील मतदान केंद्रांवर चित्रपटसृष्टीतील नामवंतानी आपला मतदानाचा हक्क बजावला.


(डावीकडून  वरून – जान्हवी कपूर, अनिल कपूर, ईशा देओल, राजकुमार राव, आशा भोसले. दिव्या दत्ता, शाहिद कपूर, नाना पाटेकर, प्रशांत दामले , परेश रावल. हेमा मालिनी, सुभाष घई, गुलजार, रणदीप हुडा, धर्मेंद्र आणि सुनील शेट्टी )


यंदाच्या निवडणुकीत निवडणूक आयोगाने मतदानाच्या विविध टप्प्यांमध्ये विशिष्ट संकल्पनेवर  आधारित मतदान केंद्रे तयार केलेली पहायला मिळाली. असेच एक आगळेवेगळे डहाणू येथे उभारलेले 'कोळी मतदान केंद्र' महाराष्ट्रातील मच्छीमारांचे प्रतिनिधित्व करते.


शहरातील विविध भागांमध्ये ज्येष्ठ नागरिक उत्साहाने मतदानासाठी बाहेर पडले.निवडणूक आयोगाने ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या मतदान केंद्रावर नेण्या-आणण्यासाठी ऑटो रिक्षा आणि बसेसची विशेष व्यवस्था केली होती.


निवडणूक आयोगाने नवमतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी मतदानपूर्व विशेष मोहीम हाती घेतली होती,त्यामुळे ज्येष्ठांचे अनुकरण करत  अनेक नवमतदारही आज मतदान करण्यासाठी बाहेर पडले.


आरामदायी आणि सुरक्षित वातावरणात मतदान पार पडावे याची काळजी घेत उन्हापासून बचावासाठी शेड, पिण्याचे पाणी, रॅम्प, स्वच्छतागृहे आणि इतर मूलभूत सुविधांसह मतदान केंद्रे मतदारांचे स्वागत करण्यासाठी सज्ज होती.


5 व्या टप्प्यात ज्या 8 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये निवडणुका होत आहेत ती पुढीलप्रमाणे : बिहार, जम्मू आणि काश्मीर, लडाख, झारखंड, महाराष्ट्र, ओडिशा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल.

N.Chitale/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 



(Release ID: 2021127) Visitor Counter : 50


Read this release in: English