शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

प्राध्यापक धीरेंद्र एस. कट्टी यांनी आयआयटी गोवाच्या संचालकपदाची स्वीकारली सूत्रे

प्रविष्टि तिथि: 10 MAY 2024 5:39PM by PIB Mumbai

 

पणजी  | 10 मे  2024

प्राध्यापक धीरेंद्र एस. कट्टी यांनी आज औपचारिकरित्या गोव्यातील भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या (आयआयटी) संचालकपदाचा पदभार स्वीकारला. प्राध्यापक बी.के. मिश्रा यांच्यानंतर कट्टी यांनी संचालकपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. हा पदग्रहण सोहळा आज संस्थेच्या आवारात पार पडला. या सोहळ्याला प्राध्यापक, कर्मचारी आणि उत्साही विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती होती.

"आयआयटी गोवा या  चैतन्यपूर्ण शैक्षणिक संस्थेत या प्रवासाला सुरुवात करताना मला खूप सन्मान वाटतो. नवोन्मेष आणि संशोधन-आधारित शैक्षणिक उत्कृष्टतेची संस्कृती जोपासणे हे माझे सर्वोच्च प्राधान्य असेल", असे यावेळी आपल्या नवीन जबाबदारीबाबत उत्कंठा व्यक्त करताना प्राध्यापक कट्टी यांनी सांगितले.

आयआयटी गोवा येथील नियुक्तीपूर्वी प्राध्यापक कट्टीआयआयटी कानपूर येथे आंतरराष्ट्रीय संबंध विभागाचे डीन (अधिष्ठाता) होते.  बायो मटेरिअल, टिश्यू इंजिनीअरिंग आणि ड्रग डिलिव्हरी सिस्टीममधील संशोधनातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी प्रसिद्ध असलेल्या प्राध्यापक कट्टी  यांनी अमेरिकेतील ड्रेक्सेल विद्यापीठ आणि व्हर्जिनिया विद्यापीठ यासारख्या सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत काम केले आहे.

***

S.Kakade/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2020255) आगंतुक पटल : 87
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English