संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

दक्षिण चीन समुद्रात पूर्वेकडील ताफ्याच्या तैनातीचा भाग म्हणून दिल्ली, शक्ती आणि किलटान या भारतीय नौदलातील जहाजांनी सिंगापूर दौरा केला पूर्ण

Posted On: 09 MAY 2024 7:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 मे 2024

भारत आणि सिंगापूर या देशांदरम्यान द्विपक्षीय व्यवस्था तसेच परस्पर हित आणि सहकार्याच्या क्षेत्रांबाबत चर्चा तसेच क्षेत्रात सागरी सुरक्षा आणि स्थैर्य सुधारण्याबाबतच्या कटिबद्धतेची ग्वाही देण्याच्या उद्देशासह भारतीय नौदलातील दिल्ली, शक्ती तसेच किलटान या जहाजांनी 06 ते 09 मे 2024 या कालावधीत सिंगापूर देशाला भेट दिली. दक्षिण चीनजवळील समुद्रात  भारतीय नौदलातील पूर्वेकडील ताफ्याच्या परिचालनात्मक नेमणुकीचा भाग म्हणून ही भेट आयोजित करण्यात आली होती.

भारतीय नौदलातील पूर्वेकडील ताफ्याचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग रियर अॅडमिरल राजेश धनखड यांच्यासह जहाजांच्या कमांडिंग अधिकाऱ्यांनी सिंगापूर नौदलाच्या मुख्यालयात सिंगापूरच्या नौदलातील फ्लीट कमांडर पदावरील अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. जहाजांच्या या भेटीमुळे नौदल सहकार्य आणि आंतरपरिचालन वाढवण्याबाबत चर्चा करण्याची संधी भारत आणि सिंगापूर या दोन्ही देशांच्या नौदलांना लाभली. आयएनएस शक्ती या जहाजाच्या डेकवर आयोजित करण्यात आलेल्या समारंभात दोन्ही देशांच्या नौदलांतील कर्मचारी तसेच सिंगापूरमधील भारतीय समुदायाचे लोक आणि स्थानिक राजनैतिक समुदायाला देखील मैत्री आणि परस्पर सन्मानाचे नाते आणखी दृढ करत एकमेकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली.

सागराशी संबंधित शिक्षण आणि माहिती प्रसाराप्रती भारतीय नौदलाच्या वचनबद्धतेचा भाग म्हणून, भारतीय जहाजांना भेट देण्यासाठी सिंगापूरमधील स्थानिक शालेय विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आले होते.या मुलांना मार्गदर्शकाच्या मदतीसह जहाजांचा फेरफटका घडवण्यात आला तेथे मुलांनी नौदलाची विविध कार्ये, भारताचा समृद्ध सागरी इतिहास आणि वारसा तसेच सागरी सुरक्षेचे महत्त्व याविषयी माहिती घेतली. युवा पिढीला प्रेरित करून त्यांच्यात सागरी घडामोडींची अधिक समज निर्माण व्हावी या उद्देशाने हा परस्पर संवाद घडवण्यात आला. भारत आणि सिंगापूर या दोन्ही देशांच्या नौदलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी, इतर व्यावसायिक विचारविनिमयासह परस्परांच्या जहाजांना भेटी देण्याचा तसेच विषय तज्ञांच्या विचारांच्या आदानप्रदानाचा (एसएमईई) उपक्रम देखील पार पाडला.

N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2020121) Visitor Counter : 78


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil