अणुऊर्जा विभाग
azadi ka amrit mahotsav

अटल इन्क्युबेशन केंद्र-बीएआरसी (एआयसी-बीएआरसी) तर्फे ‘इन्क्युबेशनसाठी अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान’ या संकल्पनेवर आधारित स्टार्टअप उद्योजकांसाठी कार्यशाळेचे आयोजन

Posted On: 03 MAY 2024 8:42PM by PIB Mumbai

मुंबई, 3 मे 2024

 

अटल इन्क्युबेशन केंद्र-बीएआरसी (एआयसी- बीएआरसी)यांच्यातर्फे मुंबईत अणुशक्तीनगर येथील डीएई कन्व्हेन्शन सेंटर येथे गुरुवार, 02 मे 2024 रोजी, एका स्टार्ट अप उद्योजकता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. एआयसी- बीएआरसीतर्फे आयोजित करण्यात आलेली ही अशा प्रकारची तिसरी कार्यशाळा आहे.

पदवी अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षात शिकणारे विद्यार्थी तसेच ज्यांनी विज्ञान/अभियांत्रिकी/वाणिज्य या शाखांतील पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे असे विद्यार्थी समाज माध्यमांवरील जाहिरातींद्वारे या कार्यशाळेसाठी आमंत्रित करण्यात आले होते. या उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळाला आणि सुमारे 87 इच्छुक उद्योजक या कार्यशाळेत उपस्थित राहिले.या कार्यक्रमात, केळ्याचे आरोग्यपूर्ण पेय, कडवटपणा घालवलेला कारल्याचा रस, जांभूळ/स्ट्रॉबेरी/चिकू/आयएमक्यूब तयार करण्याचे तंत्रज्ञान तसेच माशांवरील प्रक्रियाविषयक तंत्रज्ञान  याविषयी बीएआरसीमधील वैज्ञानिकांनी माहिती दिली. याच उत्पादनांच्या व्यापाराविषयीचे नमुने एआयसी-बीएआरसीच्या पथकाने सादर केले.

पोस्टर सत्रामध्ये, अन्नावर प्रक्रिया करण्याची विविध तंत्रज्ञाने आणि संबंधित नियामकीय प्रक्रिया यांचे देखील सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमात भाग घेतलेल्यांसाठी पदार्थ चाखून बघण्यासाठीची केंद्रे उभारण्यात आली होती. दुपारच्या जेवणात सहभागींना विकीरण(रेडिएशन) प्रक्रिया केलेले हापूस आंबे वाढण्यात आले आणि सर्वांना त्याची चव अत्यंत आवडल्यामुळे सगळ्यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला. यूएसडीए, एनपीपीओ आणि एफएसएसएआय यांच्या मंजुरीनुसार, व्यापारातील विलगीकरणाचा अडथळा पार करण्यासाठी फायटोसॅनिटरी प्रक्रिया करण्याचा मार्ग म्हणून आंब्यावर विकीरण प्रक्रिया  केली जात आहे. सकाळच्या सत्रात, डीएई तंत्रज्ञानांच्या व्यावसायिकीकरणासाठीची माहिती मिळवण्यासाठी पाच उद्योगांना परवाने देण्यासाठी तंत्रज्ञान हस्तांतरण करारांवर सह्या करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.

समारोपाच्या प्रतिसाद सत्रात, परवानेधारकांनी बीएआरसीच्या तंत्रज्ञानांवर तसेच सहयोगी संबंधांच्या सुविधेवर आधारित यशोगाथांची माहिती दिली. सामाजिक दृष्ट्या महत्त्वाच्या आणि सिध्द झालेल्या डीएईच्या या जोड-फायदा तंत्रज्ञानांचे व्यावसायिकीकरण सुरु करण्यासाठी अनेक उदयोन्मुख उद्योजक एआयसी-बीएआरसीसोबत एकत्रितपणे काम करतील अशी अपेक्षा आहे.

 

* * *

PIB Mumbai | S.Patil/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2019593) Visitor Counter : 65


Read this release in: English