संरक्षण मंत्रालय

सागरी सीमेवर होणाऱ्या बेकायदेशीर कारवाया रोखण्यासाठी तसेच क्षेत्रीय सहकार्याला चालना देण्यासाठी भारतीय तटरक्षक दल आणि रॉयल ओमान पोलीस तटरक्षक दल यांच्या अधिकाऱ्यांची नवी दिल्ली येथे बैठक

Posted On: 23 APR 2024 7:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 एप्रिल 2024

 

सागरी सीमेवर होणाऱ्या बेकायदेशीर कारवाया रोखण्यासाठी तसेच क्षेत्रीय सहकार्याला चालना देण्यासाठीच्या सहयोगात्मक प्रयत्नांमध्ये महत्त्वाचा टप्पा गाठत आज 23 एप्रिल 2024 रोजी नवी दिल्ली येथे भारतीय तटरक्षक दल (आयसीजी)आणि रॉयल ओमान पोलीस तटरक्षक दल (आरओपीसीजी) यांच्या अधिकाऱ्यांची पाचवी वार्षिक उच्चस्तरीय बैठक पार पडली. आयसीजीचे महासंचालक राकेश पाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सहभागी झालेल्या आरओपीसीजीच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व ओमानचे सहाय्यक अधिकारी कमांडिंग कर्नल अब्दुल अझीझ मोहम्मद अली अल जाबरी यांनी केले.

क्षमता उभारणी कार्यक्रम, परस्परांच्या जहाजांच्या भेटी, सी रायडर कार्यक्रमाची अंमलबजावणी, प्रदूषण नोंद करणाऱ्या केंद्रांच्या दरम्यान व्यावसायिक बंध स्थापित करणे या आणि इतर सहयोगात्मक व्यवस्थांच्या माध्यमातून द्विपक्षीय संबंधांना चालना देण्यावर या बैठकीत अधिक  भर देण्यात आला. सागरी आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी परस्पर सहकार्यात वाढ करण्यातून या प्रदेशातील सागरी सुरक्षा आणि सुरक्षितताविषयक आराखडा सशक्त करण्याबाबत दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी कटिबद्धता व्यक्त केली.

‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाअंतर्गत भारताच्या जहाजबांधणी क्षमतेचे दर्शन घडवण्याच्या दृष्टीने 25 एप्रिल 2024 रोजी भारतीय संरक्षण क्षेत्रातील उत्पादक संघ आणि आरओपीसीजीचे प्रतिनिधी यांच्यात बैठक होणार आहे

 

* * *

S.Kane/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2018632) Visitor Counter : 39


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil