सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय

मार्च 2024 मध्ये किरकोळ महागाई दर घसरण नोंदवत 4.85 टक्क्यांवर


मार्च 2024 साठी 2012 = 100 हा पाया मानून त्यावर आधारित ग्रामीण, शहरी आणि एकत्रित ग्राहक किंमत निर्देशांक

Posted On: 12 APR 2024 6:10PM by PIB Mumbai

 

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने  प्रसिद्धीपत्रकाद्वारे मार्च 2024 महिन्यासाठी (तात्पुरता) 2012=100 हा पाया मानून त्यावर आधारित अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) आणि ग्रामीण (आर), शहरी (यू ) आणि एकत्रित ग्राहक खाद्यान्न किंमत निर्देशांक (सीएफपीआय) जारी केला आहे. अखिल भारत आणि सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांसाठी उप-समूह आणि गटांसाठी देखील सीपीआय जारी केले जात आहेत.

भारतातील किरकोळ महागाई दर मार्चमध्ये वार्षिक आधारावर 4.85 टक्क्यांवर घसरला आहे, जो मागील महिन्यात 5.09 टक्क्यांवर होता.

औद्योगिक उत्पादन फेब्रुवारीमध्ये 5.7 टक्क्यांच्या चार महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचले, जे आधीच्या महिन्यात 4.2 टक्के होते.

***

S.Kane/V.Joshi/P.Kor

 

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2017794) Visitor Counter : 70