भूविज्ञान मंत्रालय
गोवा येथील राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्राचा 24 वा स्थापना दिन 5 एप्रिल 2024 रोजी साजरा केला जाणार
Posted On:
04 APR 2024 4:04PM by PIB Mumbai
पणजी, 4 एप्रिल 2024
राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्र (NCPOR) ही भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी स्वायत्त संस्था, 5 एप्रिल 2024 रोजी आपला 24 वा स्थापना दिवस संस्थेच्या परिसरात साजरा करणार असून या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू आहे. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाद्वारे संस्थेचे अग्रगण्य उपक्रम आणि उल्लेखनीय कामगिरी प्रदर्शित करण्याची संधी मिळणार आहे.
पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत गोव्यात कार्यरत असणाऱ्या राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्राने गेल्या काही वर्षांमध्ये ध्रुवीय आणि महासागर संशोधनामध्ये सातत्याने महत्त्वपूर्ण वैज्ञानिक आणि तार्किक योगदान दिले आहे. या प्रयत्नांनी जागतिक ध्रुवीय वैज्ञानिक समुदायामध्ये भारताचे अस्तित्व टिकवून ठेवण्याप्रति संस्थेची अष्टपैलुत्व आणि अतूट समर्पण अधोरेखित केले आहे तसेच हवामान बदलाची गतीशीलता चांगल्या प्रकारे समजून घेण्यात योगदान दिले आहे.
राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्राच्या संशोधनामध्ये ध्रुवीय प्रदेशातील विषम प्रदेशांपासून ते हिंद महासागराच्या तळापर्यंतच्या विस्तृत क्षेत्रांचा समावेश आहे. भूतकाळातील हवामानाचा अभ्यास करण्यापासून ते क्रायोस्फेरिक आणि महासागरीय क्षेत्रांमधील हवामान बदलावर सध्या सुरू असलेल्या संशोधनापर्यंतच्या क्षेत्रात ही संस्था वैज्ञानिक अभ्यासात आघाडीवर आहे. आपले कौशल्य आणि अत्याधुनिक प्रयोगशाळा सुविधांचा वापर करून, राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्र भारतीय ध्रुवीय कार्यक्रम तसेच हिमालयीन अभ्यास आणि भारतीय आणि आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्रातील विविध भूवैज्ञानिक कार्यक्रमांद्वारे भरीव योगदान देत आहे.
24 वा स्थापना दिवस संस्मरणीय बनवण्यासाठी या कार्यक्रमात नॅटस्ट्रॅटचे निमंत्रक आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्य राजदूत पंकज सरन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबत सन्माननीय अतिथी म्हणून अहमदाबादच्या भौतिक संशोधन प्रयोगशाळेतील ज्येष्ठ प्राध्यापक आणि संचालक डॉ. अनिल भारद्वाज हे देखील उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान "प्लॅनेटरी आणि स्पेस मिशन्स ऑफ इंडिया" या विषयावर मार्गदर्शन देखील करतील.
याशिवाय, भारती या अंटार्क्टिकामधील भारताच्या तिसऱ्या स्थानकांचे चित्र असलेले एक विशेष पोस्टकार्ड दूरदृष्टी प्रणालीमार्फत भारतीय अंटार्टिका स्थानकात भारती टपाल कार्यालय शाखेच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रकाशित केले जाईल. याशिवाय या कार्यक्रमाला मुंबई महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल के.के. शर्मा तसेच पुणे विभागाचे पोस्टमास्तर जनरल तसेच गोवा विभागाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे आर.के जायभाये या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला 250 हून अधिक लोक आणि अनेक मान्यवर उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे.
शिवाय, राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्राच्या अधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या सांस्कृतिक रजनी मुळे संस्थेमध्ये सौहार्दाची भावना निर्माण होईल आणि उत्साही वातावरणातही भर पडेल. राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्र आपल्या संपर्क आणि सहकार्य कार्यक्रमाद्वारे, वैज्ञानिक आणि समाज यांच्यातील दरी कमी करण्यासाठी वचनबद्ध आहे. भारताच्या उल्लेखनीय ध्रुवीय आणि सागरी प्रयत्नांना देशभरात प्रदर्शित करण्यासाठी ही संस्था सक्रियपणे विविध संपर्क उपक्रमांचे आयोजन करते तसेच राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमांमध्ये भाग घेते.
S.Kane/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji /PIBPanaji /pib_goa pibgoa[at]gmail[dot]com /PIBGoa
(Release ID: 2017166)
Visitor Counter : 82