संरक्षण मंत्रालय

अहमदनगरमध्ये मेकॅनाइज्ड इन्फंट्री केंद्र आणि शाळेचा स्थापना दिन

Posted On: 02 APR 2024 6:51PM by PIB Mumbai

 

मेकॅनाइज्ड इन्फंट्रीने 2 एप्रिल 2024 रोजी आपला 45 वा स्थापना दिन पारंपारिक उत्साहात  साजरा केला. या प्रसंगी अहमदनगर येथील मेकॅनाइज्ड इन्फंट्री सेंटर आणि स्कूलने केंद्रातील युद्ध स्मारकावर शूरवीरांना पुष्पचक्र अर्पण केले. ब्रिगेडियर रसेल डिसोझा, कमांडंट मेकॅनाइज्ड इन्फंट्री सेंटर अँड स्कूल यांनी पुष्पचक्र अर्पण केले.

मेकॅनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर 2 एप्रिल 1979 रोजी स्थापन करण्यात  आले आणि 17 सप्टेंबर 2021 रोजी MIC&S म्हणून पुनर्रचना  करण्यात आली. हे केंद्र पायदळ लढाऊ वाहने आणि मेकॅनाइज्ड इन्फंट्री  संकल्पनांशी संबंधित सर्व तांत्रिक आणि सामरिक बाबींचे प्रमुख केंद्र आहे. मेकॅनाइज्ड इन्फंट्रीच्या सर्व श्रेणींच्या प्रशिक्षणाव्यतिरिक्त, MIC&S वर भारतीय सैन्यातील युवा सैनिकांना लढाऊ वाहनांनी सुसज्ज सर्व प्रकारचे तांत्रिक प्रशिक्षण देण्याची जबाबदारी  तसेच  अधिकारी, कायमस्वरूपी नियुक्ती असलेले कनिष्ठ  अधिकारी आणि कायमस्वरूपी नियुक्ती नसलेले अधिकारी तसेच मित्र देशांच्या इतर श्रेणींच्या अधिकाऱ्यांसाठी तांत्रिक अभ्यासक्रम आयोजित करण्याची जबाबदारीदेखील सोपवण्यात आली  आहे .

आजच्या कार्यक्रमात  मेकॅनाइज्ड इन्फंट्रीच्या सर्व वरिष्ठ अधिकारी , कुटुंबिय आणि माजी सैनिकांचे अभिनंदन करताना, ब्रिगेडियर डिसूझा यांनी सर्वांना  राष्ट्र उभारणी आणि भारतीय सैन्याच्या सर्वांगीण वाढीसाठी त्यांचे सकारात्मक योगदान एकनिष्ठपणे सुरू ठेवण्यासाठी प्रोत्साहित केले.

***

S.Kakade/S.Kane/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2016976) Visitor Counter : 77


Read this release in: English