उपराष्ट्रपती कार्यालय
होळीच्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपतींनी देशबांधवांना दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
24 MAR 2024 6:28PM by PIB Mumbai
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी देशबांधवांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
“होळीच्या आनंदमय उत्सवानिमित्त मी सर्वांना माझ्या शुभेच्छा देतो.
परस्पर संबंध अधिक दृढ आणि स्नेहमय करणारा रंगांचा हा उत्सव वसंत ऋतूचे स्वागत करण्याचाही उत्सव आहे. हा सण, निसर्गाचे सौंदर्य आणि मानवी जीवनाच्या उत्सवाचे प्रतिक आहे. परस्परांशी असलेले मतभेद, दूर करून, नव्या चैतन्याने एकमेकांना भेटण्याची संधी हा उत्सव आपल्याला देतो.
होळीचे हे रंग, आपल्या सर्वांच्या आयुष्यात, आनंद, आशा आणि सौहार्द घेऊन येणारे ठरोत.” असं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
***
N.Chitale/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2016283)
आगंतुक पटल : 154