वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

स्टार्टअप महाकुंभमध्ये विक्रमी सहभाग आणि उत्साह


महाकुंभामध्ये 2000 हून अधिक स्टार्टअप्स, 1000 गुंतवणूकदार, 100+ युनिकॉर्न आणि 300+ इनक्यूबेटर्स आणि प्रवेगक सहभागी

Posted On: 19 MAR 2024 8:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 19 मार्च 2024

भारतातील सर्वात मोठा आणि अशा प्रकारचा पहिला स्टार्टअप कार्यक्रम असलेल्या स्टार्टअप महाकुंभमध्ये विक्रमी सहभागाची नोंद झाली असून भारतीय स्टार्टअप कार्यक्षेत्रामधील सर्व हितसंबंधितांसाठी  हा  एक सचेत  मंच ठरला आहे. या महाकुंभामध्ये  हितसंबंधीत  आणि तज्ञ एकत्र आल्यामुळे  डीपटेक,कृषी  तंत्रज्ञान (ॲग्रीटेक), जैव तंत्रज्ञान (बायोटेक) , वैद्यकीय तंत्रज्ञान (मेडटेक), कृत्रिम बुद्धिमत्ता , गेमिंग इत्यादी उदयोन्मुख क्षेत्रांचा आणखी विकास होण्यास पाठबळ मिळेल   अशी अपेक्षा आहे.

संपूर्ण भारतातील नवोन्मेष  आणि उद्यमशीलतेला चालना देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या कार्यक्रमात आघाडीचे गुंतवणूकदार, नवोन्मेषक आणि आकांक्षी  उद्योजकांचा अतुलनीय सहभाग दिसला.या कार्यक्रमात  2000 हून अधिक स्टार्टअप्स, 1000+ गुंतवणूकदार, 100+ युनिकॉर्न, 300+ इनक्यूबेटर आणि प्रवेगक , 3,000+ विचारविनिमय करणारे   प्रतिनिधी, 10+ देशाचे प्रतिनिधी, 3000+ भावी  उद्योजक आणि 50,000+ व्यावसायिक सहभागी होत आहेत. बिहार, राजस्थान, मेघालय, कर्नाटक आणि केरळसह राज्यांच्या समर्थनासह स्टार्टअप महाकुंभ दालनांमध्ये झरोधा आणि राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक(नाबार्ड ) यांचा समावेश आहे.भारतीय लघु उद्योग विकास बँक (सिडबी ), झोमॅटो आणि भारतीय  निर्यात पत हमी महामंडळ (ईसीजीसी ) यांच्या माध्यमातून समर्थित  स्टार्टअप महाकुंभमध्ये उत्तर प्रदेश राज्य या कार्यक्रमासाठी राज्य भागीदार आहे.

या कार्यक्रमातील काही ठळक मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.

  • मुख्य भाषणे : भारताची आर्थिक वृद्धी आणि विकासामध्ये स्टार्टअप्सच्या महत्त्वाच्या भूमिकेबद्दल प्रख्यात उद्योजक आणि धोरणकर्त्यांनी या कार्यक्रमाला  संबोधित केले.
  • भावी  उद्योजक दिन : विद्यार्थ्यांमध्ये उद्यमशीलतेची  भावना जोपासण्यावर लक्ष केंद्रित करून, भावी उद्योजक दिनाला महाविद्यालयांनी निवडलेल्या सुमारे 3,000 व्यक्ती एकत्र येण्याची अपेक्षा आहे.
  • 10 संकल्पनात्मक दालने  : डीपटेक, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि   सॉफ्टवेअरद्वारे सेवा , आर्थिक तंत्रज्ञान (फिन्टेक), कृषी तंत्रज्ञान (ॲग्रीटेक), जैवतंत्रज्ञान (बायोटेक) आणि औषध उत्पादन , हवामान तंत्रज्ञान (क्लायमेट टेक), गेमिंग आणि ई-क्रीडा , डी2सी, बी2बी आणि उत्पादन , आणि इनक्यूबेटर्सवर घटनांची विविधता आणि सखोलता  दर्शवणारी दालने
  • खिळवून ठेवणारे  परिसंवाद : भारतीय स्टार्टअप्सचे भविष्य आणि देशाच्या आर्थिक विकासामध्ये  त्यांनी बजावलेली महत्त्वपूर्ण भूमिका याविषयी विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी विचारप्रवर्तक चर्चा केली.सर्जनशीलता वाढवण्यासाठी आणि  स्टार्ट अप कार्यक्षेत्रातील पुढील दशक कसे असेल , स्टार्टअप्स बहु-पिढीजात व्यवसाय कशाप्रकारे  तयार करू शकतात आणि कृषी तंत्रज्ञान ,कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सॉफ्टवेअरद्वारे सेवा, हवामान तंत्रज्ञान , गेमिंग आणि डीप टेक यासारख्या प्रमुख क्षेत्रांसाठी कोणत्या संधी आहेत यासह स्टार्टअप्स मध्ये सकारात्मक उलथापालथ  आणण्यासाठीच्या धोरणांभोवती ही सत्रे आयोजित करण्यात आली होती.
  • नेटवर्किंगच्या संधी : या कार्यक्रमाने गुंतवणूकदार, उद्योजक आणि उद्योग व्यावसायिक यांच्यातील संपर्क वाढवण्यासाठी एक अनोखे  व्यासपीठ उपलब्ध करून देत  संभाव्य सहयोग आणि भागीदारींसाठी पायाभरणी केली.
  • स्टार्टअप प्रदर्शने : एक समर्पित प्रदर्शन विभाग देशभरातील होतकरू  स्टार्टअप्सद्वारे विकसित केलेली नाविन्यपूर्ण उत्पादने आणि सेवा प्रदर्शित  करतो . या मंचाने  स्टार्टअप आणि गुंतवणूकदार यांच्यातील मौलिक  परस्परसंवाद आणि संभाव्य सहयोग सुलभ केला आहे.
  • मार्गदर्शनपर सत्रे : अनुभवी उद्योजक आणि गुंतवणूकदारांनी आकांक्षी  संस्थापकांना मोलाचे  मार्गदर्शन  केले, मेंटॉरशिप क्लिनिकच्या माध्यमातून स्टार्टअप प्रवासाला दिशा दाखवण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्यांनी सुसज्ज केले.

 

S.Kane/S.Chavan/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2015603) Visitor Counter : 110


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil