संरक्षण मंत्रालय
भारतीय नौदल आणि आयआयटी खरगपूर यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी
भारतीय नौदल आणि आयआयटी खरगपूर संशोधन भागीदारीद्वारे नवोन्मेषाला देणार चालना
प्रविष्टि तिथि:
19 MAR 2024 8:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 19 मार्च 2024
भारतीय नौदल आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था, खरगपूर यांनी आज नवी दिल्ली येथील नौदल मुख्यालयात सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. यामधून या दोन्ही संस्थांची तंत्रज्ञान विकास, नवोन्मेषी उपाय आणि संयुक्त संशोधन आणि विकास याला प्रोत्साहन देण्यासाठीची वचनबद्धता स्पष्ट होते.
नौदल मुख्यालयातील सहाय्यक मटेरियल प्रमुख (डॉकयार्ड आणि रिफिट), रिअर ॲडमिरल के श्रीनिवास, आणि आयआयटी खरगपूरचे अधिष्ठाता (आर अँड डी) रिंटू बॅनर्जी, यांनी आयआयटी खरगपूरचे संचालक प्रा. वीरेंद्र कुमार तिवारी यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी केली.
हे धोरणात्मक सहकार्य भारतीय नौदल आणि आयआयटी खरगपूरच्या गटांचा समावेश असलेल्या संयुक्त संशोधन आणि विकास उपक्रमांवर केंद्रित आहे. लोणावळा येथील आयएनएस शिवाजी द्वारे या सामंजस्य करारासाठी समन्वय साधला जाईल.
हा सामंजस्य करार शैक्षणिक संस्था आणि भारतीय लष्कर यांची प्रतिकात्मक नातेसंबंधाच्या दिशेने वाटचाल दर्शवत असून, यामुळे नवोन्मेष आणि ज्ञानाच्या देवाणघेवाणीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होईल.
3PSY.jpg)
K9X7.jpg)
S.Kane/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2015593)
आगंतुक पटल : 131