पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय

पेट्रोलियम मंत्री हरदीप एस पुरी यांनी इथेनॉल 100 इंधनाचा केला प्रारंभ

Posted On: 15 MAR 2024 8:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 मार्च 2024

 

केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी इंडियन ऑइल किरकोळ विक्री केंद्र  मेसर्स इर्विन रोड सर्व्हिस स्टेशन येथे आज इथेनॉल 100 या  क्रांतिकारक वाहन इंधनाचा प्रारंभ  केला. आजपासून ग्राहक महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, नवी दिल्ली आणि तामिळनाडू या पाच राज्यांमधील निवडक 183 किरकोळ विक्री केंद्रांवर इथेनॉल 100 चा लाभ घेऊ शकतात.

इथेनॉल 100 या इंधनाचा प्रारंभ  हा  पंतप्रधानांच्या अन्नदात्यांचे  उर्जादात्यांमध्ये  रूपांतर करण्याच्या दृष्टीकोनातून प्रेरित आहे,असे हरदीप सिंह पुरी  या  अनोख्या इंधनाचा शुभारंभ करताना म्हणाले. याला क्रांतिकारी इंधन म्हणून संबोधून मंत्री म्हणाले की, इथेनॉल 100 इंधनामध्ये आपल्या वाहतूक क्षेत्राचा कायापालट करण्याची आणि जीवाश्म इंधनावरील आपले अवलंबित्व कमी करण्याची क्षमता आहे.

“हे आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी, परकीय चलन वाचवण्यासाठी आणि कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकारची वचनबद्धता दर्शवते. 2023 मध्ये पंतप्रधानांनी E20 (20% इथेनॉल मिश्रित इंधन) ची घोषणा केल्यापासून,एका वर्षाच्या आत 12,000 विक्री केंद्रां[पर्यंत ई 20 ची उपलब्धता  वाढली आहे, आणि आता इंडियन ऑइलच्या 183 विक्री केंद्रांवर  इथेनॉल 100 चा प्रारंभ केल्यामुळे आपण 2025-26 पर्यंत 20% इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट  गाठण्याच्या जवळ आहोत, असे त्यांनी सांगितले.

 

* * *

S.Kane/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2015077) Visitor Counter : 77


Read this release in: English , Urdu , Hindi