वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
विदेश व्यापार संचालनालय- डीजीएफटी नागपूर कार्यालयाच्या वतीने 12 मार्च रोजी निर्यात महोत्सवचे आयोजन
Posted On:
09 MAR 2024 9:42PM by PIB Mumbai
नागपूर 9 मार्च 2024
केंद्रीय वाणिज्य आणि व्यापार मंत्रालयाच्या अंतर्गत नागपूरच्या सिव्हिल लाईन्स येथील नवीन सचिवालय भवन येथे स्थित विदेश व्यापार संचालनालय- डीजीएफटी या कार्यालयाच्या वतीने उत्तर नागपूरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर येथे येत्या 12 मार्च मंगळवार रोजी सकाळी 11 वाजता निर्यात महोत्सवचे आयोजन करण्यात येणार आहे . विदेश व्यापार संचालनालय नवी दिल्लीचे महासंचालक संतोष कुमार सारंगी, (भाप्रसे) या कार्यक्रमा प्रसंगी अध्यक्षीय भाषण करणार आहेत .
सदर निर्यात महोत्सवाचे आयोजन हे गेल्या वर्षीच्या जुलै पासून ते ते फेब्रुवारी 2024 या कालावधीत महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यांच्या 49 जिल्ह्यांमध्ये केले जात असून या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्याला एक्सपोर्ट हब बनवण्याचा प्रयत्न या महोत्सवाच्या माध्यमातून केला जात आहे.या निर्यात महोत्सवामध्ये इंडिया पोस्ट, बँक ऑफ महाराष्ट्र, वन विभाग, पर्यटन विभाग, वनामती, कृषी विभाग, फलोत्पादन विभाग, माविम, आदिवासी विकास विभाग नागपूर, निर्यात प्रोत्साहन परिषद, कृषी प्रक्रियाकृत खाद्य उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण अपेडा , स्पाइस बोर्ड, अभियांत्रिकी निर्यात प्रोत्साहन परिषद इइपीसी, भारतीय रेशीम निर्यात प्रोत्साहन परिषद त्याचप्रमाणे ॲमेझॉन ग्लोबल यांसारख्या संस्थांचा समावेश राहणार आहे
महाराष्ट्रातील विदर्भ प्रदेश, तसेच मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील 49 जिल्ह्यांमधून कृषी आणि फलोत्पादन उत्पादने, लघु वनउत्पादने, अभियांत्रिकी वस्तू, फार्मा उत्पादने, प्लास्टिक उत्पादने , संरक्षण उत्पादने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, खाणी आणि खनिज यांची निर्यात वाढवणे हा या निर्यात महोत्सवाच्या आयोजनामागील हेतू आहे.
,या कार्यक्रमात, विदेश व्यापार संचालनालयाचेअधिकारी आणि इतर संस्था आयात आणि निर्यात प्रक्रिया आणि योजना आणि दस्तऐवजीकरण यावर सविस्तर माहिती देतील. जिल्ह्यांतील- एक जिल्हा एक उत्पादन ओडीओपी उत्पादने तसेच निर्यात क्षमता असलेली इतर उत्पादने या कार्यक्रमात स्टॉल्सवर प्रदर्शित केली जातील.
शेतकरी उत्पादक संघटना एफपीओ उद्योग संघटना, उद्योजक, महिला बचत गट हस्तशिल्प कारागीर आणि विविध औद्योगिक संघटनांच्या सदस्यांना या निर्यात महोत्सवात सहभागी होवून विदर्भ प्रदेशातून निर्यातीचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी तसेच आयात आणि निर्यातीची गतिशीलता समजून घेण्यासाठी सक्रियपणे सहभागी होण्यासाठी विदेश व्यापार संचालनालय नागपुरद्वारे आवाहन करण्यात आले आहे.
***
D.Wankhede/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2013108)
Visitor Counter : 58