आदिवासी विकास मंत्रालय
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, राष्ट्रीय आदिवासी संशोधन संस्थेने आदिवासी महिलांच्या उल्लेखनीय कामगिरीचा उत्सव केला साजरा
Posted On:
09 MAR 2024 7:54PM by PIB Mumbai
राष्ट्रीय आदिवासी संशोधन संस्थेने (NTRI) ने नवी दिल्लीत 8 आणि 9 मार्च 2024 रोजी कर्तृत्ववान आदिवासी महिलांवर आधारित ‘आदि व्याख्यानमाला पुष्प - 5 वे’ आयोजित केले. या दोन दिवसीय व्याख्यानमालेची मुख्य संकल्पना - आदिवासी उत्कृष्टतेचे सक्षमीकरण, अशी होती.
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आदिवासी महिलांच्या उल्लेखनीय कामगिरीचा उत्सव साजरा करणाऱ्या या कार्यक्रमात कला, संगीत, साहित्य, क्रीडा, हस्तकला, पारंपरिक ज्ञान इत्यादी क्षेत्रातील सुमारे 200 कर्तृत्ववान आदिवासी महिला सहभागी झाल्या होत्या. आसाम, महाराष्ट्र, राजस्थान, ओडिशा, मिझोराम, छत्तीसगड, झारखंड, गुजरात आणि दिल्ली या राज्यातील आदिवासी महिला या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.
आदिवासी कार्य मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव आर. जया यांनी या कार्यक्रमात उद्घाटनपर भाषण केले आणि यश संपादन करणाऱ्या आदिवासी महिलांचे अभिनंदन करून त्यांच्या प्रयत्नांची प्रशंसा केली. आदिवासी महिलांना उद्योजकतेच्या माध्यमातून सक्षम बनवणे ही शाश्वत विकासाची गुरुकिल्ली आहे, असे आर. जया यांनी सांगितले. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास’ यातून विकसित भारताचे स्वप्न साकार होईल, असे त्यांनी सांगितले. आदिवासी महिलांनी ही दृष्टी सुनिश्चित करण्याचा मार्ग दाखवला आहे, असे त्या म्हणाल्या.
***
S.Kakade/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2013101)
Visitor Counter : 107