शिक्षण मंत्रालय
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शालेय आणि शिक्षक शिक्षणासंदर्भात विविध उपक्रमांचा केला प्रारंभ
डीआयईटी ऑफ एक्सलन्स, नॅशनल प्रोफेशनल स्टँडर्ड फॉर टीचर्स, नॅशनल मिशन फॉर मेंटॉरिंग, एनसीईआरटी चे 52 प्राइमर्स, राष्ट्रीय विद्या समीक्षा केंद्र आणि 200 दूरचित्रवाहिन्यांचा केला प्रारंभ
आज सुरू केलेल्या उपक्रमांमुळे एनईपी 2020 ची प्रभावी अंमलबजावणी होईल, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे सक्षमीकरण होईल आणि दर्जेदार शिक्षण अधिक समावेशक, अभिनव आणि न्याय्य होईल - धर्मेंद्र प्रधान
Posted On:
09 MAR 2024 7:28PM by PIB Mumbai
केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज नवी दिल्लीत कौशल भवन येथे शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाद्वारे विकसित शालेय आणि शिक्षक शिक्षणातील विविध उपक्रमांचा प्रारंभ केला.
प्रधान यांनी नॅशनल मिशन फॉर मेंटॉरिंग (एनएमएम ) आणि नॅशनल प्रोफेशनल स्टँडर्ड्स फॉर टीचर्स (एनपीएसटी ) , भारतीय भाषांमधील 52 प्राइमर्स, एनएमएम आणि एनपीएसटी वरील मुद्रित पुस्तके, सीईआरटी / डीआयईटी च्या व्हिडिओसह विविध योजना/मार्गदर्शक तत्त्वे ; विद्या समीक्षा केंद्र आणि 200 दूरचित्रवाणी वाहिन्यांचा व्हिडिओ जारी केला.
या कार्यक्रमात बोलताना प्रधान यांनी 2047 पर्यंत विकसित भारत बनण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा दिवस असल्याचे घोषित केले. ते म्हणाले की, DIETS ऑफ एक्सलन्स, नॅशनल प्रोफेशनल स्टँडर्ड फॉर टीचर्स, नॅशनल मिशन फॉर मेंटॉरिंग, एनसीईआरटी चे 52 प्राइमर्स, राष्ट्रीय विद्या समीक्षा केंद्र आणि 200 दूरचित्रवाणी वाहिन्यामुळे एनईपी 2020 ची तळागाळात प्रभावी अंमलबजावणी होईल, तसेच हे उपक्रम शिक्षक आणि विद्यार्थ्यांना सक्षम बनवतील आणि दर्जेदार शिक्षण अधिक समावेशक, अभिनव आणि न्याय्य बनवतील.
भाषा ही शक्ती आहे आणि मातृभाषेतून शिकणे हे परिवर्तन घडवणारे आहे या संदेशाचा पुनरुच्चार करून प्रधान म्हणाले की भारतीय भाषांमधील 52 प्राइमर्सने नवीन सांस्कृतिक पुनर्जागरणाचा मार्ग सुकर केला आहे. या उपक्रमांमुळे एक वेगवान आणि भविष्यानुरूप शिक्षण व्यवस्था तयार होईल, भारतीय भाषांमधील शिक्षणाला चालना मिळेल, एनईपी 2020 ची संकल्पना साकार होईल आणि शालेय शिक्षणात समग्र परिवर्तन होईल असे ते म्हणाले.
***
S.Kakade/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2013098)
Visitor Counter : 131