उपराष्ट्रपती कार्यालय
महिला दिनाच्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपतींचा संदेश
Posted On:
07 MAR 2024 10:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 मार्च 2024
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने मी आपल्या देशातील आणि परदेशातील सर्व महिलांना माझ्या स्नेहपूर्ण शुभेच्छा देतो.
समाजाच्या प्रत्येक क्षेत्रातील महिलांनी अविचल निर्धार, अमर्याद करुणाभाव आणि निरंतर दृढनिश्चय या गुणांसह दिलेल्या अमूल्य योगदानाचा उत्सव साजरा करण्याचा हा दिवस आहे.
महिलांना समान हक्क आणि संधी मिळण्याची सुनिश्चिती करून आपण अधिक समावेशक आणि समृद्ध समाजाच्या निर्मितीचा मार्ग तयार करू शकतो. नारी शक्ती वंदन अधिनियम मंजूर होणे ही या दिशेने झालेली युगप्रवर्तक घडामोड असून त्यायोगे आपल्या कन्या आणि भगिनींना त्यांचे अधिकार मिळणार आहेत.
आजच्या दिवशी, प्रत्येक महिला स्वतःची संपूर्ण क्षमता जाणून घेण्यास सक्षम होईल आणि तिच्या प्रगतीच्या मार्गात येणारा प्रत्येक अडथळा दूर झालेला असेल अशा वातावरणाची निर्मिती करण्यासाठी आपण स्वतःला पुन्हा वचनबद्ध करुया.
पुन्हा एकदा, आनंदी आणि प्रेरणादायी आंतरराष्ट्रीय महिलादिनाच्या सर्वांना शुभेच्छा.
* * *
S.Kane/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2012487)
Visitor Counter : 67