दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
सीपीएमजीच्या महाराष्ट्र परिमंडळ कार्यालयात 19 मार्च 2024 रोजी डाक अदालतीचे आयोजन
Posted On:
04 MAR 2024 7:30PM by PIB Mumbai
मुंबई, 4 मार्च 2024
मुंबई येथील जीपीओ संकुलाच्या ऍनेक्स इमारतीत पाचव्या मजल्यावर महाराष्ट्र परिमंडळाच्या मुख्य पोस्टमास्टर जनरल यांच्या कार्यालयात येत्या 19 मार्च 2024 रोजी दुपारी 3 वाजता 126व्या डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र तसेच गोवा या राज्यांतील टपाल सेवांशी संबंधित ज्या तक्रारींचे निवारण 6 आठवड्यांच्या झालेले नाही अशा तक्रारींवर या अदालतीमध्ये सुनावणी होणार आहे. बिगर-नोंदणीकृत/नोंदणीकृत टपाल, स्पीड पोस्ट, कार्यालयातील सेवा, बचत खाते आणि मनीऑर्डरद्वारे पैसे न पोहोचणे यांसारख्या विषयांशी संबंधित तक्रारींवर या डाक अदालतीमध्ये कारवाई केली जाईल.मूळ तक्रार ज्या अधिकाऱ्याकडे दाखल केली होती त्याचे नाव तसेच हुद्दा, तक्रारीशी संबंधित वस्तू/मनीऑर्डर/बचत खाते/ प्रमाणपत्रे यांचे तपशील इत्यादी बाबींचा समावेश या तक्रारीमध्ये असला पाहिजे.
या अदालतीमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांनी टपाल सेवेविषयीच्या तक्रारी नक्कल प्रतीसह, दिनांक 11 मार्च 2024 पूर्वी डाक अदालत विभागाचे सहाय्यक संचालक, टपाल सेवा (पीजी) आणि सचिव यांच्याकडे मुख्य पोस्ट मास्तरांचे कार्यालय, महाराष्ट्र परिमंडळ, अॅनेक्स इमारत, जीपीओ संकुल चौथा मजला, मुंबई- 400001 या पत्त्यावर पाठवावेत.
* * *
PIB Mumbai | S.Patil/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2011377)