सांस्कृतिक मंत्रालय

भगवान श्रीरामाची जन्मभूमी असलेल्या अयोध्येवरून नाव दिलेल्या अयुथ्थ्या या थायलंडमधील प्राचीन शहराला बिहारचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी दिली भेट

Posted On: 24 FEB 2024 6:37PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 फेब्रुवारी 2024   

 

बिहारचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ यांनी आज थायलंडमधील अयुथ्थ्या या प्राचीन शहराला भेट दिली. भारतामधील भगवान श्रीरामाचे जन्मस्थान असणाऱ्या अयोध्येच्या नावावरून या शहराचे नामकरण करण्यात आले आहे. थायलंडमध्ये 26 दिवसांच्या प्रदर्शनासाठी भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष घेऊन गेलेल्या 22 सदस्यीय भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व राज्यपाल श्री. आर्लेकर करत आहेत.

  

  

अयुथ्थ्या शहराला भेट देताना राज्यपाल आर्लेकर म्हणाले की हे शहर भारतीय आणि थाई संस्कृतीमधील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संबंध दर्शवते, ज्याचे थायलंडमधील लोकांनी आणि सरकारने जतन केले आहे. बौद्ध वारसा आणि बोधगयाचे माहेरघर असलेल्या बिहार राज्याचे राज्यपाल असल्यामुळे आपल्याला अयुथ्थ्या या ऐतिहासिक शहराला भेट देण्याची संधी मिळाली, हे आपले भाग्य आहे, ते सुद्धा भारतातील अयोध्या शहरात राम मंदिराचे उद्घाटन होत असताना, असे ते म्हणाले.

  

”ही प्राचीन मंदिरे, राजवाडे आणि अवशेष केवळ थायलंडच्या समृद्ध इतिहासाची आणि संस्कृतीची सखोल माहिती देत नाहीत तर आधुनिक थायलंडची सांस्कृतिक मुळे आणि वारशाची खोली समजून घेण्यास देखील मदत करतात. भारतातील लोकांना या संस्कृतीशी जोडण्यासाठी आणि भारतीय संस्कृतीचा जगभरात प्रसार व्हावा यासाठी पावले उचलली पाहिजेत,” असेही राज्यपाल म्हणाले.

* * *

M.Pange/G.Deoda/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2008652) Visitor Counter : 70