ऊर्जा मंत्रालय

एन टी पी सी रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड (आर ई एल) चा पहिला सौर प्रकल्प झाला कार्यान्वित

Posted On: 23 FEB 2024 9:58PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 23  फेब्रुवारी 2024

एन टी पी सी रिन्युएबल एनर्जी लिमिटेड (एन टी पी सी-आर ई एल ) च्या राजस्थानमधील छत्तरगड येथील पहिल्या सौर प्रकल्पाने 21 फेब्रुवारी 2024 रोजी 70 मेगावॅट क्षमतेचे व्यावसायिक कार्य सुरू केल्याचे घोषित केले आहे. यामुळे आता, एन टी पी सी समूहाची स्थापित उर्जा क्षमता 73,958 मेगावॉटवर पोहोचली आहे.

सध्या, एन टी पी सी-आर ई एल चे 17 प्रकल्प कार्यान्वित आहेत, त्यांची एकूण क्षमता 6,000 मेगावॉट पेक्षा जास्त आहे. याशिवाय , एन टी पी सी समूहाची एकूण अक्षय ऊर्जा परिचालन क्षमता 3,448 मेगावॅट इतकी आहे.

यावेळी एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी  मोहित भार्गव आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

छत्तरगढ सौर प्रकल्पाची निर्धारित पूर्ण क्षमता 150 मेगावॅट इतकी असून तो मार्च 2024 पर्यंत कार्यान्वित होणे अपेक्षित आहे. सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या तिसऱ्या टप्प्याअंतर्गत ही क्षमता संपादित करण्यात आली असून राजस्थानला या प्रकल्पाचा लाभ होणार आहे.

दरवर्षी  370 दशलक्ष युनिट ऊर्जा निर्मिती होईल या दृष्टीने या प्रकल्पाची रचना करण्यात आली आहे,इतकी ऊर्जा 60,000 कुटुंबाच्या ऊर्जेच्या आवश्यकतेएवढी आहे.  तसेच यामुळे दरवर्षी 3 लाख टन इतके कार्बन उत्सर्जन कमी होईल आणि 1,000 दशलक्ष मेट्रिक टन प्रतिवर्ष पाण्याची बचत होईल. जे पाणी एका वर्षात 5,000 हुन अधिक कुटुंबांसाठी पुरेसे आहे.

 

 

S.Patil/B.Sontakke/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2008548) Visitor Counter : 75


Read this release in: English , Urdu , Hindi