संरक्षण मंत्रालय

सैनिक भर्ती कार्यालय, मुंबई द्वारे वर्ष 2024-25 करिता अग्निवीर भर्तीसाठी अधिसूचना जारी

Posted On: 14 FEB 2024 2:43PM by PIB Mumbai

 

अग्निपथ योजनेंतर्गत भर्ती वर्ष 2024-25 करिता अग्निवीर प्रवेश निवड चाचणीसाठी अविवाहित पुरुष उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन सैनिक  भर्ती कार्यालयाने( मुंबई) केले आहे.

13 फेब्रुवारी 2024 ते 22 मार्च 2024 या कालावधीत ऑनलाइन अर्ज सादर करता येतील.

ऑनलाइन परीक्षेच्या (सीईई ) तारखा: 22 एप्रिल 2024 नंतर

केवळ मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यात कायमचे वास्तव्य  असणाऱ्या उमेदवारांकडून हे  अर्ज मागविण्यात येत आहेत.

उमेदवारांसाठी महत्वाची सूचना

1.भर्ती वर्ष 2024-25 साठी, अग्निवीरांची भर्ती दोन टप्प्यात केली जाईल:-

(अ) टप्पा I - ऑनलाइन संगणक आधारित लेखी परीक्षा (ऑनलाइन सीईई)

(b) टप्पा II - भर्ती मेळावा

2. ऑनलाइन नोंदणीसाठी प्रक्रिया

(a) सर्व उमेदवारांनी joinindianarmy.nic.in वर लॉग इन करावे, त्यांची पात्रता स्थिती तपासावी आणि स्वतःचे प्रोफाइल तयार करावे

(b) ऑनलाइन नोंदणी (अर्ज सादर करणे) 13 फेब्रुवारी ते 22 मार्च 2024 पर्यंत सुरू राहील.

(c) अर्जदाराच्या डिजिलॉकर खात्यातून वैयक्तिक तपशील प्राप्त केला जाईल.

(d) परीक्षा शुल्क. - ऑनलाइन परीक्षेसाठी उमेदवाराला प्रति अर्जदार रु. 250/- परीक्षा शुल्क भरावे लागेल.यशस्वीरित्या अर्ज भरलेल्या उमेदवाराला संकेतस्थळावरील दुव्याच्या माध्यमातून एसबीआय पोर्टलवर जाण्यासाठी निर्देशित केले जाईल.

एसबीआय पोर्टलवर रु. 250/- तसेच लागू असलेले बँक शुल्क भरावे.  पुढीलपैकी  कोणत्याही पेमेंट पर्यायाद्वारे पेमेंट केले जाऊ शकते:-

(i) प्रमुख बँकांच्या मेस्ट्रो, मास्टर कार्ड, व्हिसा, रूपे कार्ड्स  दोन्ही क्रेडिट आणि डेबिटद्वारे पेमेंट गेटवे सुविधा.

(ii) एसबीआय आणि इतर बँकांचे इंटरनेट बँकिंग.

(iii) यूपीआय (भीम).

(e ) बनावट/अपूर्ण/चुकीचा भरलेला अर्ज नाकारला जाईल.

(f ) उमेदवारांकडे सक्रिय ईमेल आणि मोबाइल क्रमांक असणे आवश्यक आहे जो पुढे संपर्क साधण्यासाठी  वापरता येईल.

(g )  या अधिसूचनेला प्रतिसाद देत उमेदवारांनी एकदाच अर्ज करावा.!

(h) उमेदवारांनी परीक्षा केंद्राचे पाच पर्याय सूचित केले पाहिजेत. पहिल्या तीन निवडींवर आधारित परीक्षा केंद्र देण्याचे शक्य ते सर्व प्रयत्न केले जातील.

(j) परीक्षा केंद्र किंवा निवड चाचणीची तारीख बदलण्याची विनंती स्वीकार्य नसेल.

(k) परीक्षेसाठी विहित तारखेला आणि वेळेवर हजर न राहणाऱ्या उमेदवारांना इतर दिवशी परीक्षेची मुभा दिली जाणार नाही.

(l) उमेदवाराने ऑनलाइन अर्जात आधार क्रमांक टाकावा.

(m) ऑनलाइन नोंदणी आणि ऑनलाइन अर्जासाठी, उमेदवारांना मुंबईतील सैनिक भर्ती कार्यालयाच्या हेल्पलाइन क्रमांक 022-22153510 वर कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेत सहाय्य केले जाईल.

3. ऑनलाइन सीईई

(a) उमेदवारांना त्यांच्या श्रेणीनुसार ऑनलाइन सीईई सराव करण्यास सक्षम करण्यासाठी JoinIndianArmy या संकेतस्थळावर श्रेणीनिहाय लिंक प्रदान करण्यात आली आहे. सर्व उमेदवारांना प्रत्यक्ष सीईई परीक्षेपूर्वी किमान एकदा तरी सराव करण्याचा सल्ला दिला जातो.

(b) "नोंदणी कशी करावी" आणि "ऑनलाइन सीईई साठी कसे उपस्थित राहावे" याचे ॲनिमेटेड व्हिडिओ www.joinindianarmy.nic.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

4. उमेदवारांना JoinIndianArmy संकेतस्थळावर फक्त अलीकडील छायाचित्रे अपलोड करण्याचा सल्ला दिला जातो. अपलोड केलेला फोटो चेहऱ्याशी जुळत नसल्यास, उमेदवाराला ऑनलाइन सीईई देण्याची परवानगी दिली जाणार नाही.

5. उमेदवारांनी प्रवेशपत्राच्या रंगीत प्रिंट आऊटसह  परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे. परीक्षेच्या ठिकाणी प्रारंभिक पडताळणीदरम्यान किंवा निवड प्रक्रियेच्या त्यानंतरच्या कोणत्याही टप्प्यावर विसंगती/अनियमितता/चुकीची माहिती आढळल्यास उमेदवारांना ऑनलाइन परीक्षेत उपस्थित राहण्यापासून प्रतिबंधित केले जाईल.

6. निवड चाचणी (टप्पा -I आणि II) आणि वैद्यकीय चाचणीसाठी उमेदवारांनी ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड (प्रवेशपत्रावर दर्शवल्यानुसार) सोबत ठेवावे.

7. आवश्यक शैक्षणिक पात्रता, शारीरिक/वैद्यकीय मानके आणि नोकरीचे तपशील याविषयीचे तपशील उमेदवाराच्या लॉगिन अंतर्गत www.joinindianarmy.nic.in वर उपलब्ध आहेत आणि उमेदवार साइनिंग इन न करता ही माहिती मिळवू शकतो.

***

S.Kakade/S.Chavan/V.Joshi/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2005922) Visitor Counter : 102


Read this release in: English