संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डेहराडूनमध्ये भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ दिवंगत जनरल बिपिन रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण केले
Posted On:
12 FEB 2024 8:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 12 फेब्रुवारी 2024
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 12 फेब्रुवारी 2024 रोजी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या उपस्थितीत डेहराडून मधील टोन्स ब्रिज स्कूल येथे देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस), दिवंगत जनरल बिपिन रावत यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केले. जनरल रावत यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांनी आदरांजली वाहिली. जनरल रावत हे एक वीर सैनिक आणि चांगला माणूस म्हणून कायम स्मरणात राहतील, आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरतील, असे संरक्षण मंत्री म्हणाले.
जनरल रावत हे देशाच्या लष्करी परंपरेचे खरे प्रतीक होते, जेथे सैनिकाचे जन्मस्थान कोणतेही असले, तरी तो देशाच्या सुरक्षेसाठी समर्पित राहतो, असेही ते म्हणाले.
देशाचे पहिले सीडीएस म्हणून जनरल रावत यांची नियुक्ती करण्यात आली, जी देशाच्या लष्करी इतिहासातील सर्वात महत्वाच्या सुधारणांपैकी एक आहे, असे संरक्षण मंत्री म्हणाले.
‘सैनिकांचा सन्मान राखणे आणि त्यांच्या योगदानाचा सन्मान करणे’ हे सरकारचे कर्तव्य असल्याचे संरक्षण मंत्री म्हणाले. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या सैनिकांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा आपण सन्मान करत आहोत," त्यांनी अधोरेखित केले. सशस्त्र दलांना अत्याधुनिक शस्त्रांनी सुसज्ज करण्याबरोबरच, सरकारने शूरवीरांना आदरांजली वाहण्यासाठी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय युद्ध स्मारक उभारले आहे, यावर त्यांनी भर दिला.
जनरल रावत यांच्या पुतळ्याची स्थापना शाळेच्या आवारात करण्याच्या कल्पनेची प्रशंसा करून, संरक्षण मंत्री म्हणाले की, सशस्त्र दलाच्या शौर्य गाथा मुलांपर्यंत पोहोचवणे आणि त्यांच्यामध्ये देशभक्ती आणि समर्पणाची भावना जागृत करणे, हे यामागचे उद्दिष्ट आहे.
N.Chitale/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2005420)
Visitor Counter : 157