सांस्कृतिक मंत्रालय
संगीत नाटक अकादमी हैदराबादमध्ये दक्षिण भारत सांस्कृतिक केंद्र स्थापन करणार
Posted On:
11 FEB 2024 6:55PM by PIB Mumbai
भारत सरकारने गेल्या 10 वर्षांमध्ये आपला मूर्त आणि अमूर्त स्वरूपातला वारसा भावी पिढ्यांसाठी जतन आणि संवर्धित होईल, हे सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. संगीत नाटक अकादमी ही, संस्कृती मंत्रालयांतर्गत स्वायत्त संस्था असून भारताच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचा संगीत, नृत्य आणि नाटकाच्या स्वरूपात अभिव्यक्त विशाल अमूर्त सांस्कृतिक वारसा जतन आणि संवर्धित करण्यासाठी सर्वोच्च संस्था आहे. दक्षिण भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा अधिक प्रचार करण्यासाठी हैदराबादमध्ये संगीत नाटक अकादमीचे एक प्रादेशिक केंद्र स्थापन करण्याचा सांस्कृतिक मंत्रालयाचा मानस असून ते दक्षिण भारत सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखले जाईल.
''जगभरात नावाजला गेलेला दक्षिण भारताचा समृद्ध आणि वैविध्यपूर्ण अमूर्त सांस्कृतिक वारसा, संगीत नाटक अकादमीच्या या समर्पित दक्षिण भारत सांस्कृतिक केंद्राच्या माध्यमातून अधिक प्रोत्साहित केला जाईल, ही अभिमानाची बाब आहे, '' असे केंद्रीय संस्कृती मंत्री जी किशन रेड्डी यांनी म्हटले आहे.
आतापर्यंत अकादमीचे दक्षिण भारतात अस्तित्व नव्हते. संगीत, लोककला व आदिवासी कला, नाट्यकला आणि कठपुतळी यांचे संशोधन आणि दस्तऐवजीकरण याला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र परिकल्पित असून ते अत्याधुनिक प्रादेशिक केंद्र म्हणून आणि सांस्कृतिक विकासाला चालना देणारे आणि अभिव्यक्तीला पोषक एक प्रमुख सांस्कृतिक स्थान म्हणून विकसित केले जाईल.
'भारत कला मंडपम' सभागृहाची पायाभरणी आणि संगीत नाटक अकादमीच्या दक्षिण भारत सांस्कृतिक केंद्राचे उद्घाटन सोमवार 12 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5 वाजता हैदराबादमधल्या हायटेक सिटी इथल्या शिल्प कला वेदिका येथे होणार आहे. यावेळी संगीतकार घंटाशाला यांच्या योगदानावर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू आणि केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी 12 फेब्रुवारी रोजी या केंद्राचे उद्घाटन करणार आहेत.
***
N.Chitale/S.Kakade/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2005120)
Visitor Counter : 115