युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
मिशन ऑलिम्पिक सेलच्या बैठकीत, प्रशिक्षण आणि अनेक स्पर्धांसाठी तीन जुडोका आणि एक नेमबाज इलावेनिल वालारिवन यांच्या प्रस्तावांना मंजुरी
Posted On:
09 FEB 2024 9:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 फेब्रुवारी 2024
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय (एम. वाय. ए. एस.) मिशन ऑलिंपिक सेलने (एम. ओ. सी.) नुकत्याच झालेल्या बैठकीत जूडोका हिमांशी टोकस, श्रद्धा चोपडे आणि अस्मिता डे यांच्या प्रशिक्षणासाठी आणि त्यांच्या अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेण्याच्या प्रस्तावांना मान्यता दिली आहे.
कनिष्ठ आशियाई अजिंक्यपद सुवर्णपदक विजेती हिमांशी टोकस आणि कनिष्ठ ओशनिया अजिंक्यपद सुवर्णपदक विजेती श्रद्धा चोपडे पॅरिस, फ्रान्स ग्रँडस्लॅम, बाकू, अझरबैजान ग्रँड स्लॅम; ताश्कंद, उझबेकिस्तान ग्रँड स्लॅम आणि लिंझ, ऑस्ट्रिया ग्रँड प्रिक्ससाठी रवाना होणार आहे; कनिष्ठ आशियाई चषक सुवर्णपदक विजेती अस्मिता डे फ्रान्स ग्रँड स्लॅमसाठी पॅरिसमध्ये तिच्यासोबत सहभागी होणार आहे.
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय (एम.वाय.ए.एस.) त्यांच्या लक्ष्य ऑलिम्पिक पोडियम योजने (टि.ओ.पी.एस.) अंतर्गत या सर्व स्पर्धा आणि प्रशिक्षण कालावधी दरम्यान विमान भाडे, विसावा/निवास, विमा आणि स्थानिक वाहतूक खर्च उचलेल.
बैठकीदरम्यान, मिशन ऑलिम्पिक सेलने (एम. ओ. सी.) नेमबाज इलावेनिल वालारिवनच्या स्पेनमध्ये आगामी आय.एस.एस.एफ. विश्वचषक स्पर्धेत केवळ रँकिंग पॉइंट्स (आर.पी.ओ.) श्रेणी अंतर्गत सहभागी होण्याच्या विनंतीला मान्यता दिली. त्यांचे विमान भाडे, प्रवेश शुल्क, प्रशिक्षण शुल्क, स्थानिक वाहतूक खर्च, व्हिसा आणि विमा शुल्कासह इतर सर्व खर्च देखील टी.ओ.पी.एस. निधी अंतर्गत उचलले जातील.
* * *
S.Bedekar/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2004730)
Visitor Counter : 71