सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
उद्योगांच्या वार्षिक सर्वेक्षणाचे स्वयं-संकलन करण्याचे महत्व आणि पद्धती अधोरेखित करण्यासाठी तसेच समस्यांवर चर्चा करण्यासाठी डब्ल्यूटीसी मुंबई येथे राज्यस्तरीय गोलमेज परिषदेचे आयोजन
Posted On:
08 FEB 2024 8:30PM by PIB Mumbai
मुंबई , 8 फेब्रुवारी 2024
मुंबईत वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे आज (8 फेब्रुवारी 2024) अखिल भारतीय उद्योग महासंघाच्या सहकार्याने औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर राज्यस्तरीय गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली होती. उद्योगांच्या वार्षिक सर्वेक्षणाचे स्वयं-संकलन करण्याचे महत्व आणि पद्धती अधोरेखित करणे तसेच समस्यांवर चर्चा करणे हे या परिषदेचे उद्दिष्ट होते. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय (फील्ड ऑपरेशन्स विभाग ) द्वारे दरवर्षी उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण केले जाते.
0MC1.jpeg)
अखिल भारतीय उद्योग महासंघाचे अध्यक्ष विजय कलंत्री, राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय, प्रादेशिक कार्यालय, मुंबई च्या उपमहासंचालक सुप्रिया रॉय,महाराष्ट्र सरकारच्या अर्थशास्त्र आणि सांख्यिकी संचालनालयाचे सहसंचालक अमोल खंदारे या परिषदेला उपस्थित होते.

आपल्या भाषणात विजय कलंत्री यांनी नमूद केले की, उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण संघटना आणि औद्योगिक कारखान्यांच्या सहकार्याने यशस्वी करता येऊ शकते , यामुळे सरकारला औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी धोरणे आणि योजना आखण्याचा मार्ग सुकर होईल. उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण विवरणपत्र वेळेत सादर करण्यासाठी संघटनांच्या हितासाठी परिषदेचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाच्या प्रयत्नांची प्रशंसा केली.
BI5U.jpeg)
उपमहासंचालक सुप्रिया रॉय यांनी उद्योगांचा वार्षिक सर्वेक्षण डेटा भारतातील उत्पादन क्षेत्राच्या औद्योगिक आकडेवारीचा प्रमुख स्त्रोत असल्याचे नमूद करत या डेटाचे महत्त्व स्पष्ट केले. अर्थव्यवस्थेतील उद्योगांच्या सकल मूल्यवर्धनाच्या संकलनासाठी डेटाचा वापर केला जातो. सर्वेक्षणाद्वारे संकलित माहिती गोपनीय आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना वार्षिक सर्वेक्षण डेटा वेळेत सादर करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन उद्योगांना केले.

तसेच रॉय यांनी अधोरेखित केले की, निवडलेल्या कंपन्यांना पोर्टलवर अचूक डेटा सादर करण्यासाठी मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय विविध औद्योगिक क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण शिबिर आयोजित करत आहे .
अमोल खंदारे यांनी डीईएस ची भूमिका आणि महाराष्ट्र राज्याचे नियोजन आणि धोरण आखणीसाठी वार्षिक सर्वेक्षण डेटाचा राज्य कसा वापर करत आहे हे स्पष्ट केले.
परिषदेदरम्यान, उद्योगांच्या वार्षिक सर्वेक्षणाचे महत्त्व आणि ऑनलाइन पोर्टलद्वारे त्याचे स्वयं-संकलन याविषयी माहिती देण्यात आली . उत्पादन युनिटची मालकी, परिचालन आणि कामकाज तसेच एकूण मूल्यवृद्धीमध्ये क्षेत्राचे योगदान समजून घेण्याच्या उद्देशाने, उत्पादन युनिटच्या परिचालन खर्च आणि परिचालन पावत्यांसंबंधी वार्षिक सर्वेक्षण डेटा आणि इनपुट आणि आउटपुटचा तपशील संकलित केला जातोअशी माहिती यावेळी देण्यात आली. मोठे उद्योग ज्यांचे एकूण मूल्यवृद्धीत अधिक योगदान आहे आणि जे उच्च प्राधान्य उद्योग म्हणून संबोधले जातात अशांकडून प्राधान्याने माहिती मागवली जाते. त्यामुळे उत्पादन क्षेत्राच्या सहकार्यानेच डेटा संकलनाचे काम यशस्वी होणे गरजेचे आहे.
बैठकीला विविध औद्योगिक संघटनांचे एकूण 45 पदाधिकारी उपस्थित होते. सहभागी झालेल्यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.
पार्श्वभूमी
उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण हे भारतातील औद्योगिक सांख्यिकींचा प्रमुख स्त्रोत आहे. उत्पादन प्रक्रिया, दुरुस्ती आणि सेवा, वीज निर्मिती आणि पारेषण , गॅस आणि पाणी पुरवठा आणि शीतगृह इत्यादींशी संबंधित कार्याचा समावेश असलेल्या संघटित उत्पादन क्षेत्राच्या विकास , रचना आणि संरचनेतील बदलांचे मूल्यांकन करण्यासाठी ते सांख्यिकीय माहिती उपलब्ध करून देते. हे सर्वेक्षण सांख्यिकी संकलन कायदा, 2008 (2017 मध्ये दुरुस्ती केल्याप्रमाणे) आणि त्याअंतर्गत तयार केलेल्या नियमांनुसार वैधानिक स्वरूपाचे आहे.
S.Tupe/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2004208)
Visitor Counter : 97