जलशक्ती मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

14.24 कोटींहून अधिक (73.93%) ग्रामीण कुटुंबांना आता त्यांच्या घरात नळाद्वारे पाणी पुरवठा

Posted On: 08 FEB 2024 5:53PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 8 फेब्रुवारी 2024

भारत सरकार देशातील सर्व ग्रामीण कुटुंबांना पुरेशा प्रमाणात, विहित गुणवत्तेचा, नियमित आणि दीर्घकालीन आधारावर सुरक्षित आणि पिण्यायोग्य नळाच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी वचनबद्ध आहे. या उद्देशाच्या पूर्ततेसाठी भारत सरकारने जल जीवन मिशन (जेजेएम) चा ऑगस्ट 2019 मध्ये प्रारंभ केला. राज्यांच्या भागीदारीत या मिशनची अंमलबजावणी केली जात आहे. पेयजल ही राज्याच्या अखत्यारीत येणारी बाब आहे, आणि म्हणूनच, जल जीवन मिशन अंतर्गत पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा योजनांचे नियोजन, मान्यता, अंमलबजावणी, कार्यान्वयनाची जबाबदारी आणि देखभाल यांची जबाबदारी राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकारकडे सोपविण्यात आली आहे. यासाठी भारत सरकार राज्यांना तांत्रिक आणि आर्थिक सहाय्य देऊन मदत करते.

जल जीवन मिशन सुरू झाल्यापासून ग्रामीण भागातील घरांपर्यंत नळाद्वारे पाण्याची उपलब्धता वाढविण्याच्या दिशेने देशात लक्षणीय प्रगती झाली आहे.  ऑगस्ट 2019 मध्ये जल जीवन मिशनच्या घोषणेच्या वेळी, केवळ 3.23 कोटी (17%) ग्रामीण कुटुंबांकडे नळ जोडणी असल्याची नोंद करण्यात आली होती.  राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी 04.02.2024 पर्यंत नोंदवल्यानुसार, अतिरिक्त 11.01 कोटी ग्रामीण कुटुंबांना जल जीवन मिशन अंतर्गत नळाद्वारे पाण्याची जोडणी प्रदान करण्यात आली आहे.  अशा प्रकारे, 04.02.2024 पर्यंत देशातील 19.27 कोटी ग्रामीण कुटुंबांपैकी, 14.24 कोटी (73.93%) पेक्षा जास्त कुटुंबांना त्यांच्या घरांमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा होत असल्याची नोंद आहे.

जल जीवन मिशनच्या अंमलबजावणीमध्ये राज्यांसमोर उभी असलेली काही प्रमुख आव्हाने खालीलप्रमाणे सूचीबद्ध करण्यात आली आहेत:

1.पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या भागात अवलंबून राहण्याजोग्या पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचा अभाव,

2.भूजलामध्ये भू-जनिक दूषित घटकांची उपस्थिती,

3.असमान भौगोलिक भूभाग, विखुरलेल्या ग्रामीण वस्त्या,

4.गावातील पाणी पुरवठा पायाभूत सुविधांचे व्यवस्थापन आणि संचालन करण्यासाठी स्थानिक ग्राम समुदायांमध्ये क्षमतेचा अभाव.

राज्यांच्या अहवालानुसार 30.01.2024 पर्यंत,'हर घर जल' म्हणून नोंदवलेल्या सुमारे 2.02 लाख गावांपैकी, 1.01 लाखाहून अधिक गावे संबंधित ग्रामसभेने प्रमाणित केली आहेत.  राज्य आणि केंद्रशासित प्रदेशानुसार त्यांचा तपशील परिशिष्ट-I मध्ये आहे.

जलशक्ती राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

Annex-I

State/ UT-wise Har Ghar Jal reported and certified

 

S. No.

State

Har Ghar Jal reported

Har Ghar Jal Certified

1

A & N Islands

265

265

2

Andhra Pradesh

4,533

3,550

3

Arunachal Pradesh

5,064

4,575

4

Assam

4,571

2,018

5

Bihar

32,190

1

6

Chhattisgarh

2,110

550

7

DNH & DD

96

96

8

Goa

373

373

9

Gujarat

17,871

15,821

10

Haryana

6,502

6,502

11

Himachal Pradesh

17,816

10,752

12

Jammu & Kashmir

839

303

13

Jharkhand

2,106

1,362

14

Karnataka

5,282

2,852

15

Kerala

103

60

16

Ladakh

150

31

17

Lakshadweep

3

2

18

Madhya Pradesh

12,086

5,761

19

Maharashtra

16,456

9,919

20

Manipur

611

283

21

Meghalaya

1,975

1,015

22

Mizoram

411

296

23

Nagaland

705

401

24

Odisha

11,380

5,247

25

Puducherry

114

114

26

Punjab

11,845

11,845

27

Rajasthan

3,360

1,519

28

Sikkim

103

39

29

Tamil Nadu

5,368

4,028

30

Telangana

9,458

0

31

Tripura

45

35

32

Uttar Pradesh

19,794

9,141

33

Uttarakhand

7,459

2,831

34

West Bengal

2,754

1,077

 

Total

2,03,798

1,02,664

Source: JJM-IMIS

N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2004103) Visitor Counter : 108


Read this release in: Hindi , English , Urdu